IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला धक्का, हेड कोच गंभीर घरी परतला

India vs England Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. या टेस्टपूर्वी टीम इंडियाला धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Gautam Gambhir : गौतम गंभीर तातडीनं मायदेशी परतला आहे.
मुंबई:

India vs England Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिजला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झालीय. यंदा भारतीय टीम शुबमन गिलच्या (Shubman Gill) कॅप्टनसीखाली खेळणार आहे. त्यासाठी  इंट्रा-स्क्वाड सामना शुक्रवारपासून (13 जून 2025) सुरु होत आहे. या मॅचपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे इंग्लंडमधून मायदेशी परतला आहे. भारत टीमच्या इंट्रा-स्क्वाड सामन्यापूर्वी गंभीर तातडीनं मायदेशी परतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडिया या सीरिजमध्ये उतरणार आहे. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये निवड समितानं तरुण खेळाडूंना संधी दिलीय. शुबमन गिल कॅप्टम तर ऋषभ पंत हा या टीमचा व्हाईस कॅप्टन आहे. आयपीएल गाजवणारा साई सुदर्शन आणि देशांतर्गत सिझनमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या करुण नायरचाही या टीममध्ये समावेश करण्यात आलाय.

Advertisement

( नक्की वाचा :  Sourav Ganguly : इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडियाच्या निवडीवर गांगुली नाराज, 'या' खेळाडूला बाहेर ठेवल्याबद्दल सुनावलं )

इंग्लंडविरुद्धची पाच टेस्ट मॅचची ही सीरिज 20 जून रोजी लीड्समध्ये सुरू होईल.बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन, लंडनमध्ये लॉर्ड्स आणि द ओव्हल, तसेच मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे पुढील टेस्ट मॅच होणार आहेत.   

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया : शुभमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत (व्हाईस कॅप्टन/विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.

Advertisement

पहिल्या टेस्टसाठी इंग्लंडची टीम : शोएब बशीर, जेकेब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कूक, झॅक क्रॉली, बेन डकेत, जेमी ओव्हरटोन, ओली पोप, जो रुट, जेमी स्मिथ (विकेट किपर), बेन स्टोक्स (कॅप्टन), जोश टंग आणि ख्रिस वोक्स
 

Topics mentioned in this article