Sarfaraz Khan, India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टेस्ट पुण्यात सुरु झाली आहे. टीम इंडियाला पहिल्या दोन्ही विकेट्स अनुभवी स्पिनर आर. अश्विननं मिळवून दिल्या. पण, दुसऱ्या विकेटचं क्रेडीट पूर्णपणे अश्विनला देता येणार नाही. कारण या विकेटमध्ये सर्फराज खानचंही महत्त्वाचं योगदान होतं.
न्यूझीलंडचा ओपनर विल यंगच्या बॅटला लागलेला बॉल अश्विनच्या ग्लोजमध्ये विसावला. त्यावेळी तो बॉल बॅटला लागलाय की नाही याबाबत पंत आणि अन्य खेळाडूांना खात्री नव्हती. पण, सर्फराजला बॉल बॅटला लागलाय यावर पूर्ण विश्वास होता. त्यानं रोहित शर्माला रिव्ह्यू घेण्याचा जोरदार आग्रह केला. रोहितनं अखेर सर्फराजचा आग्रह मान्य करत रिव्ह्यू घेतला. त्यावेळी थर्ड अंपायरनं भारताच्या बाजूनं निर्णय दिला. मैदानात सेच झालेल्या विल यंगला परत जावं लागलं.
सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये विराट कोहलीसह टीम इंडियाचे अन्य खेळाडूंचं रिव्ह्यू घेऊ नये असं मत होतं. पण, सर्फराज 'भैया मैं बोल रहा हूं ना...' असं बोलताना ऐकू येत आहे. सर्फराजला पूर्ण खात्री असलेलं पाहूनच रोहित शर्मानं थर्ड अंपायरकडं दाद मागण्याचा निर्णय घेतला.
( नक्की वाचा : IPL 2025 : KL राहुलचं भवितव्य ठरलं! झहीर खाननं सादर केला खळबळजनक रिपोर्ट )
टीम इंडियात तीन बदल
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन टेस्टच्या सीरिजमधील हा दुसरा सामना आहे. बंगळुरु टेस्टमध्ये पराभूत झाल्यानंतर सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडियाला या टेस्टमध्ये विजय आवश्यक आहे. भारतीय टीमनं या मॅचमध्ये तीन बदल केले आहेत. केएल राहुल कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजच्या जागी शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीपच टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.