IND vs PAK: दिवाळीच्या दिवशी भारत-पाकिस्तान महामुकाबला, क्रिकेटच्या मैदानात होणार सिक्सर्सचा धमाका!

India vs Pakistan: कोणताही खेळ असला तरी त्यामधील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लढतीला खास महत्त्व आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
भारत-पाकिस्तान फॅन्सचा प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

मानसी पिंगळे, प्रतिनिधी

India vs Pakistan Hong kong Sixes 2024: कोणताही खेळ असला तरी त्यामधील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लढतीला खास महत्त्व आहे. त्यातच दोन्ही टीममध्ये क्रिकेटची मॅच होणार असेल तर संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष त्याकडं लागलं असतं. यंदा तर ऐन दिवाळीमध्ये या दोन टीम आमने-सामने येणार आहेत. 

हाँगकाँगमध्ये यंदा तब्बल सात वर्षांनंतर हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट टुर्नामेंट होणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 टीम खेळणार आहेत. क्रिकेटच्या सर्वसाधारण स्पर्धेपेक्षा ही स्पर्धा वेगळी असून त्यामुळेच अधिक रंगतदार होणार आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे वेगळेपण?

क्रिकेटच्या टीममध्ये साधारण 11 खेळाडू असतात. पण, या स्पर्धेतील टीममध्ये फक्त 6 खेळाडू असतील. 5 ओव्हर्सची एक इनिंग असेल. प्रत्येक खेळाडूला फक्त एक ओव्हर टाकायला मिळणार आहे.

त्यामुळे दबावाच्या क्षणी कोणता बॉलर बॉलिंग करणार याचा निर्णय घेणं कॅप्टनसमोर आव्हान असेल. त्याचबरोबर टीममधील पाच नाही तर सर्व 6 बॅटर आऊट होईपर्यंत टीम खेळेल. पाचवा बॅटर आऊट झाल्यानंतर शेवटचा खेळाडू एकटाच बॅटिंग करेल.

कधी होणार भारत-पाक सामना?

ही स्पर्धा  1 ते 3 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानसह यजमान हाँगकाँग, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड यूएई, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि ओमान अशा 12 टीम सहभागी होत आहेत. 

भारताचा पहिला सामना 1 नोव्हेंबरला पाकिस्तानशी भारतीय वेळेनुसार 11:30 वाजता सुरू होईल. भारतीयांना हे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसंच फॅनकोडच्या माध्यमातून लाईव्ह पाहता येतील.

( नक्की वाचा : IPL 2025 Retention : रोहित शर्माबाबत संभ्रम कायम, MI 'या' 4 जणांना नक्की रिटेन करणार? )

कशी आहे भारत आणि पाकिस्तानची टीम?

टीम इंडियाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा या स्पर्धेत भारतीय टीमचं नेतृत्त्व करतोय. मनोज तिवारी, केदार जाधव, शाहबाज नदीम, स्टुअर्ट बिन्नी, भरत चपली आणि श्रीवत्स गोस्वामी हे खेळाडू भारताच्या टीममध्ये आहेत. 

फहीम अश्रफ हा पाकिस्तान टीमचा कॅप्टन असून आसिफ अली, शाहाब खान, मुहम्मद अखलाक, दानिश अली,आमेर यामिन, हुसैन तलाक हे पाकिस्तान टीमचे खेळाडू आहेत.