Jemimah Rodrigues New Home: भारतीय महिला क्रिकेट संघाची आघाडीची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) हिने तिच्या आयुष्यातील मोठा निर्णय घेतला आहे. जेमिमाहने नवी मुंबईत नवीन घर खरेदी केलं आहे. राहण्याच्या दृष्टीने नव्हे तरी क्रिकेट कारकिर्दीसाठी तिने हा मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत तिच्या चमकदार कामगिरीमुळे ती चर्चेत आहे. आता क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी तिने नवी मुंबईतील वाशी येथे नवीन घर घेतले आहे.
वाशी येथे उत्कृष्ट दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण आणि सराव सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा येथे उपलब्ध असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. वाशीतील सेक्टर 14 मधील हे घर तिच्या फिट राहण्यासाठी आणि प्रशिक्षण रुटीनसाठी फायदेशीर ठरणारं आहे.
मुंबईतील वांद्रे येथे तिचे बालपण गेले. मात्र बालपणीचे घर सोडून नवी मुंबईसारख्या शहरात येण्याचा तिने निर्णय घेतला. कारण जेमिमाह नवी मुंबईत क्रिकेटचा सराव करते. त्यामुळे हा प्रवासाचा वेळ आणि ये-जा टाळण्यासाठी वाशीतील घर तिच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 'मॅजिकब्रिक्स'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं.
(नक्की वाचा : EXCLUSIVE: 'खाण्यासाठी पैसे नव्हते', वर्ल्ड चॅम्पियन Kranti Goud ने NDTV ला सांगितली संघर्षाची कहाणी, पाहा Video )
जेमिमाहची एकूण संपत्ती
जेमिमाह रॉड्रिग्स क्रिकेटमधून कोट्यवधींची कमाई करते. WPL करारात तिला महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 2.2 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. WPL हे तिच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे.
बीसीसीआय करार
तिला बीसीसीआयच्या (BCCI) ग्रेड-बी करारानुसार वार्षिक 30 लाख रुपये मिळतात. तसेच, कसोटी सामन्यांसाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यांसाठी 6 लाख रुपये आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी 3 लाख रुपये इतकी सामना फी मिळते.
ब्रँड एंडोर्समेंट
हुंडई, जिलेट, रेड बुल, ड्रीम11 आणि प्लॅटिनम एवारासह अनेक मोठ्या ब्रँड्ससोबत तिचे करार आहेत. 2025 पर्यंतच्या अहवालानुसार, जेमिमाह रॉड्रिग्सची एकूण संपत्ती अंदाजे 8 कोटी ते 15 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.