India's Squad For England Tour : चांगल्या कामगिरीनंतरही बुमराहला बसणार धक्का, BCCI च्या मनात काय?

Jasprit Bumrah, India's Squad For England Tour : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिज 20 जूनपासून सुरु होत आहे. या सीरिजपासून टीम इंडिया आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अभियानाला(WTC) सुरुवात करेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

India's Squad For England Tour : जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा सध्या भारतामधलाच नाही तर जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम बॉलर मानला जातो. काही महिन्यांपूर्वी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये बुमराहनं ते सिद्ध केलं होतं. बुमराहनं त्या सीरिजमधील 9 इनिंगमध्ये 32 विकेट्स घेतल्या होत्या. बुमराह ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन होता. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये बुमराहच्या नेतृत्त्वामध्ये भारतानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकमेव टेस्ट जिंकली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आगमी इंग्लंड दौऱ्यात बुमराह टेस्ट टीमचा कॅप्टन होणार का? ही चर्चा सध्या सुरु होती. विद्यमान कॅप्टन रोहित शर्माचा टेस्टमधील फॉर्म खराब आहे. त्यामुळे कॅप्टनपदासाठी बुमराहचे नाव आघाडीवर होते. पण, बुमराहला कॅप्टनसी सोडा, व्हाईस कॅप्टन पदावरुनही दूर करण्याचा विचार बीसीसीसीआय करत आहे. 'इंडियन एक्स्प्रेस' नं हे वृत्त दिलं आहे. 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरिज 20 जूनपासून सुरु होत आहे. या सीरिजपासून टीम इंडिया आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अभियानाला(WTC) सुरुवात करेल. या सीरिजसाठी लवकरच भारतीय टीमची घोषणा केली जाणार आहे.

( नक्की वाचा : India's Squad For England Tour : रोहित शर्माचं भवितव्य ठरलं! फॉर्मातील 2 खेळाडूंना जागा नाही? )
 

काय आहे निर्णय?

या वृत्तानुसार इंग्लंड सीरिजमध्ये सर्व पाच टेस्ट खेळू शकेल अशा खेळाडूंना कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. या रिपोर्टनुसार बुमराह त्याच्या वर्क लोड मॅनेजमेंटमुळे  पाचही टेस्ट खेळणार नाही. त्यामुळे त्याला व्हाईस कॅप्टन पदावरुन दूर करण्यात येईल. वेगवेगळ्या टेस्टसाठी वेगळे व्हाईस कॅप्टन नियुक्त करण्याचा बीसीसीआयचा विचार नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे. 

Advertisement

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दरम्यान बुमराहची पाठदुखी बळावली होतीय. या दुखापतीमुळे तो तीन महिने क्रिकेटपासून दूर होता. त्याला आयसीसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळता आलं नव्हतं. अखेर त्यानं काही आठवड्यापूर्वी आयपीएल 2025 मध्ये पुनरागमन केलं. त्यानंतर बुमराह इंग्लंड सीरिजमधील सर्व पाच टेस्ट खेळणार नाही हा निर्णय निवड समितीनं घेतला आहे. 

बुमराहच्या जागेवर एखाद्या तरुण खेळाडूला भविष्याचा विचार करुन व्हाईस कॅप्टन करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. त्यासाठी शुबमन गिल आणि ऋषभ पंत हे दोन पर्याय बीसीसीआयकडं आहेत. हे दोघंही तरुण आहेत. आयपीएल टीमचे कॅप्टन असल्यानं त्यांना नेतृत्त्व करण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर पाचही टेस्ट खेळतील असं मानलं जात आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article