जाहिरात

T20 World Cup 2026 : निवड समितीचा मोठा निर्णय, वर्ल्ड कप टीममधून गिलची हकालपट्टी, एक अनपेक्षित एन्ट्री

India's T20 World Cup 2026 Squad Announcement : फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या T20 होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

T20 World Cup 2026 : निवड समितीचा मोठा निर्णय, वर्ल्ड कप टीममधून गिलची हकालपट्टी, एक अनपेक्षित एन्ट्री
India's T20 World Cup 2026 Squad : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई:

India's T20 World Cup 2026 Squad Announcement : फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या T20 होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये निवड समितीनं एक धक्कादायक निर्णय घेतलाय. दिग्गज खेळाडू शुबमन गिलचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

गिल T20 टीमचा व्हाईस कॅप्टन होता. त्याच्याकडं भावी कॅप्टन म्हणून पाहिलं जात होतं. पण, त्याचा या फॉर्मेटमधील फॉर्म खराब होता. त्यामुळेच त्याला संधी मिळालेली नाही. 

या टीममध्ये इशान किशनचं पुनरागमन झालं आहे. तो या टीममधील संजू सॅमसनसह दुसरा विकेट किपर असेल. झारखंडला सय्यद मुश्ताक अली स्पर्धा जिंकून देण्यात इशान किशनचा मोठा वाटा होता. या कामगिरीचं फळ त्याला मिळालं आहे. 

ऑल राऊंडर अक्षर पटेल हा या टीमचा व्हाईस कॅप्टन असेल. तर गिलच्या अनुपस्थितीमध्ये संजू सॅमसन अभिषेक शर्मासह टीमची ओपनिंग करेल. भारतीय टीम या प्रकारातील चॅम्पियन आहे. 2024 साली वेस्ट इंडिजमध्ये झालेली स्पर्धा भारतानं जिंकली होती. यंदा टीम इंडियासमोर ही चॅम्पियनशिप राखण्याचं आव्हान आहे.

( नक्की वाचा : Prithvi Shaw :पृथ्वी शॉचं नशीब फक्त 6 मिनिटात बदललं, 'ती' प्रतिक्रिया वाचून फॅन्सही गहिवरले! )
 

7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळली जाणार आहे.  भारतीय टीम या स्पर्धेत A ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तानसह नामिबिया, अमेरिका आणि नेदरलँड्स या टीमचा समावेश आहे.

( नक्की वाचा : T20 World Cup 2026 : टीम इंडियातून Shubman Gill आऊट! बीसीसीआयचा मोठा निर्णय; नेमकं कुठं बिनसलं? Inside Story )

T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम

सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (व्हाईस कॅप्टन), रिंकू सिंह, जस्प्रीत बुमराह, हार्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंगटन सुंदर, इशान किशन

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com