भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. आजच्या अंतिम सामन्यानंतर टी 20 वर्ल्ड कपचा विजेता ठरणार आहे. दोन्ही संघ वर्ल्ड कपमध्ये एकही सामना न गमावता अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. त्यामुळे जो संघ वर्ल्ड कपवर नाव कोरेन त्या संघावर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. तर उपविजेता संघ देखील मालामाल होणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयपीएलनंतर आयसीसीकडून यावेळी आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम विजेत्या संघाला दिली जाणार आहे. आयसीसीकडून 11.25 कोटी म्हणजेच 93.80 कोटी रुपयांच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- IND vs SA Final : फलंदाज की गोलंदाज; बारबाडोसमध्ये कुणाची जादू चालणार? वाचा पिच रिपोर्ट)
विजेत्या संघाला किती बक्षिस मिळणार?
भारत किंवा दक्षिण आफ्रिका दोन्हीपैकी एक संघ वर्ल्ड कप विजेता ठरणार आहे. वर्ल्ड कप विजेत्या संघाला 2.45 मिलियन डॉलर म्हणजेच 20.42 कोटी रुपये मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला विजेत्या संघापेक्षा निम्मी रक्कम मिळणार आहे. उपविजेत्या संघाला 1.28 मिलियन डॉलर म्हणजेच 10.67 कोटी रुपये मिळणार आहेत.
(नक्की वाचा - IND vs SA Final : कोण जिंकणार वर्ल्ड कप? 5 लढती करणार निश्चित)
सेमीफायनलिस्ट आणि इतर संघही होणार मालामाल
सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या संघांना देखील 6.56 कोटी रुपये मिळणार आहेत. प्रत्येक संघाली ही रक्कम मिळणार आहे. तर सुपर 8 पर्यंत पोहोचलेल्या संघाला 3 कोटी 18 लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय 9 ते 12 व्या स्थानावर राहिलेल्या संघांना 2.06 कोटी रुपये मिळणार आहेत. तर 13 ते 20 व्या स्थानवर राहिलेल्या संघांना 1.87 कोटी रुपये मिळणार आहेत.