जाहिरात

IND vs SA Final : कोण जिंकणार वर्ल्ड कप? 5 लढती करणार निश्चित

IND vs SA Final: बार्बाडोसमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये काही खेळाडूंमध्ये वैयक्तिक लढत होणार आहे. या लढती मॅचचं भवितव्य निश्चित करतील.

IND vs SA Final : कोण जिंकणार वर्ल्ड कप? 5 लढती करणार निश्चित
File photo of Indian cricket team. @AFP
मुंबई:

IND vs SA Final: भारतीय क्रिकेट टीमनं आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 (ICC T20 World Cup Final) च्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम आता विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे.भारताची फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेशी लढत होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही टीमनं या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियानं 2007 नंतर एकदाही टी20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही. तर, आफ्रिकेची टीम पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे दोन्ही टीम फायमल जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. शनिवारी (29 जून) बार्बाडोसमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये काही खेळाडूंमध्ये वैयक्तिक लढत होणार आहे. या लढती मॅचचं भवितव्य निश्चित करतील.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रोहित शर्मा वि. मार्को जेनसन ( Rohit Sharma vs Marco Jansen)

पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर आणि शाहीन आफ्रिदी या डावखुऱ्या बॉलरनं रोहितला यापूर्वी त्रस्त केलंय.  जेनसन या इतिहासापासून प्रेरणा घेऊ शकतो. दोघांमधील लढतीचे आकडे रोहितच्या बाजूनं आहेत. रोहितनं आत्तापर्यंत 9 टी20 इनिंगमध्ये सामना केलाय. त्यामध्ये तो फक्त एकदा आऊट झालाय. रोहितनं या वर्ल्ड कपमधील 7 मॅचमध्ये 41.33 ची सरासरी आणि 155.97 च्या स्ट्राईक रेटनं 248 रन केले आहेत. यामध्ये 3 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. जेनसननं 8 मॅचमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. 

विराट कोहली वि. कागिसो रबाडा ( Virat Kohli vs Kagiso Rabada)

भारतीय टीम या स्पर्धेत अपराजित असली तरी विराटचा फॉर्म हा काळजीचा विषय आहे. विराटनं 7 मॅचमध्ये फक्त 75 रन केले आहेत. कागिसो रबाडानं या स्पर्धेत 12 विकेट्स घेतल्या असून त्याचा इकोनॉमी रेट 6 पेक्षा कमी आहे. विराटला रबाडाला खेळताना अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल. रबाडानं 13 इनिंगमध्ये विराटला 4 वेळा आऊट केलंय. विराटनं त्याच्या विरुद्ध फक्त 51 रन काढले आहेत.  

ऋषभ पंत वि. केशव महाराज (Rishabh Pant vs Kagiso Rabada)

ही लढत देखील रंगतदार होईल. ऋषभ पंतनं 7 मॅचमध्ये 171 रन केले आहेत. तर महाराजनं 9 विकेट्स घेतल्या आहेत. पंत तिसऱ्या नंबरवर बॅटिंग करतोय. त्याचा पहिल्या 10 ओव्हर्समध्येच महाराजचा सामना करावा लागू शकतो. पंतच्या अपारंपारिक फटकेबाजीपासून वाचण्यासाठी महाराजला अचूक बॉलिंग करावी लागेल. 

ट्रेंडींग बातमी - IND vs SA Final : टीम इंडियाचं फायनलपूर्वी टेन्शन वाढलं,सर्वात मोठ्या पनौतीशी होणार सामना
 

जसप्रीत बुमराह वि. क्विंटन डी कॉक (Jasprit Bumrah vs Quinton De Kock )

क्विंटन डी कॉकनं या वर्ल्ड कपमधील 8 मॅचमध्ये 204 रन केले आहेत. त्याचा वर्ल्ड कपमध्ये सामना जगातील सर्वश्रेष्ठ बॉलर जसप्रीत बुमराहशी होईल. बुमराहनं 4.12 च्या इकोनॉमी रेटनं 13 विकेट्स घेतल्या आहेत. डी कॉकला बुमराहला अत्यंत सावधगिरीनं खेळावं लागेल. 

कुलदीप यादव वि. हेरनिच क्लासेन (Kuldeep Yadav vs Heinrich Klaasen )

क्लासेन स्पिन बॉलिंग खेळण्यात एक्स्पर्ट आहे. त्यानं या वर्ल्ड कपमधील 8 मॅचमध्ये 138 रन केले आहेत. कुलदीप क्लासेनला किती लवकर आऊट करतो त्यावर मॅचचं चित्रं अवलंबून असेल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com