टी 20 वर्ल्ड कपची फायनल आज भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात बारबाडोस येथे खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांची आतापर्यंतची वर्ल्ड कपमधील कामगिरी दमदार राहिली आहे. साऊथ आफ्रिकेना सलग 8 सामने जिंकत फायनलमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. तर भारताने 8 पैकी 7 सामने जिंकून फायनल गाठली आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टीम इंडिया तिसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा फायनल खेळणार आहे. भारताने पहिल्यांदा 2007 मध्ये वर्ल्ड कप आपल्या नावे केला होता. त्यानंतर भारत 2014 मध्ये फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र त्यावेळी श्रीलंकेने विजय मिळवत वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. आता टीम इंडियाला पुन्हा एकदा वर्ल्ड कपवर नाव कोरण्याची संधी आहे.
भारत-साऊथ आफ्रिका हेड टू हेड
टी 20 मध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 26 वेळा आमने-सामने आले आहेत. ज्यामध्ये 14 वेळा भारताने बाजी मारली आहे. तर साऊथ आफ्रिकेने 11 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. याशिवाय टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 6 वेळा आमने-सामने आले आहेत. ज्यामध्ये 4 वेळा भारत तर 2 वेळा साऊथ आफ्रिकेने विजय मिळवला आहे.
(नक्की वाचा - IND vs SA Final : कोण जिंकणार वर्ल्ड कप? 5 लढती करणार निश्चित)
बारबाडोस पिच रिपोर्ट
बारबाडोसच्य केंसिंग्टन ओव्हल मैदानातील पिचवर गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीसाठी समान संधी आहेत. या पिचवर जलद गोलंदाजांना मदत मिळते आणि बाऊंस देखील पाहायला मिळतो. तर मिडल ओव्हर्समध्ये स्पिनर्स आपली कमाल दाखवू शकतात. या पिचवर पहिल्या इनिंगमधील सरासरी धावा 153 आहेत. या सामन्यात टॉसची भूमिका महत्त्वाची असेल. या मैदानात एकूण 32 टी 20 सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी केलेल्या संघ 19 वेळा विजय झाला आहे. तर 11 वेळा दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. दोन सामन्यात कोणताही निकाल लागला नाही.
सामन्यादरम्यान पावसाची शक्यता
बारबाडोसमध्ये सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. AccuWeather नुसार स्थानिक वेळेनुसार 4 ते 9 वाजेदरम्यान पावसाची शक्यता 50 टक्के आहे. सामना पूर्ण करण्यासाठी आज 190 मिनिटाची वेळ राखीव आहे. जर सामना शनिवारी पावसामुळे पूर्ण झाला नाही तर सामना रविवारी रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळवला जाईल.
(नक्की वाचा - भारत वि. दक्षिण आफ्रिका सामन्यावर पावसाचं सावट; सामना रद्द झाल्यात निर्णय कसा लागणार?)
पावसामुळे सामना रद्द झाला तर काय?
पावसामुळे फायनलचा निकाल लागला नाही तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेते घोषित केले जाईल. मात्र दोन्ही संघांनी किमान 10-10 ओव्हर खेळणे गरजेचं आहे. मात्र तसं झालं नाही तर दोन्ही संघ विजेते ठरतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world