विराट - रोहित असो वा बुमराह-राशिद IPL मधील हे रेकॉर्ड मोडणे आहे अवघड

आयपीएलमधील काही रेकॉर्ड मोडणे हे आता जवळपास अशक्य आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली (फोटो : BCCI/IPL)
मुंबई:

जगातील सर्वात प्रतिष्ठेची टी20 लीग ही ओळख असलेल्या आयपीएलला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात या सिझनमधील पहिली मॅच होणार आहे.

आयपीएलचा हा सतरावा सिझन असून यामध्ये काही रेकॉर्ड मोडणे हे जवळपास अशक्य आहे.

सर्वाधिक वैयक्तिक रन
वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलचा 11 वर्षांचा रेकॉर्ड यंदाही कुणीही मोडण्याची शक्यता नाही. गेलनं आरसीबीकडून खेळताना 2013 साली 66 बॉलमध्ये 175 रन्स केले होते. गेलच्या या खेळीत 13 फोर आणि 17 सिक्सचा समावेश होता. 

एका सिझनमध्ये सर्वाधिक रन्स
आरसीबीचा प्रमुख खेळाडू विराट कोहली 2016 च्या सिझनमध्ये जबरदस्त फॉर्मात होता. विराटनं त्या सिझनमध्ये चार सेंच्युरीसह 973 रन्स केले आहेत. विराट कोहलीचा हा रेकॉर्ड देखील अद्याप अबाधित आहे. आयपीएलमधील वाढती स्पर्धा लक्षात घेता तो यापुढेही कायम राहण्याची चिन्ह आहेत.

एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स
ख्रिस गेल आणि रविंद्र जडेजा यांच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. या दोघांनीही एकाच ओव्हरमध्ये 37 रन्स करण्याचा पराक्रम केलाय. त्यांना नो आणि वाई़ड बॉलचीही मदत मिळाली. पण, त्यानंतरही आता यापुढे ओव्हरच्या प्रत्येक बॉलवर या प्रकारची फटकेबाजी करणे अवघड आहे.

Advertisement

सर्वाधिक फायनल
आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. धोनीनं आत्तापर्यंत  9 आयपीएल फायनलमध्ये खेळण्याचा विक्रम केलाय. यापैकी आठवेळा तो चेन्नई सुपर किंग्सकडून तर एक वेळा रायझिंग सुपर जायंट्सकडून आयपीएल खेळलाय. धोनीचा हा विक्रम भविष्यात कुणी मोडण्याची शक्यता कमी आहे.

3 हॅट्ट्रिक
भारताचा दिग्गज स्पिनर अमित मिश्रानं आयपीएल स्पर्धेत आत्तापर्यंत तीन वेळा हॅट्ट्रिक घेण्याची कमाल केलीय. मिश्राजी म्हणून क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या या दिल्लीकर स्पिनरनं 2008, 2011 आणि 2013 च्या सिझनमध्ये ही कामगिरी केलीय.

Advertisement

अमित मिश्रानंतर युवराज सिंहचा या यादीत नंबर आहे. युवराजनं आयपीएलमध्ये दोन वेळा हॅट्ट्रिक घेतलीय. पण युवराज क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्त झाल्यानं अमित मिश्राचा हा रेकॉर्ड यंदाही कायम राहील हे स्पष्ट आहे. 

सर्वाधिक सलग विजय

गौतम गंभीर या सिझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेटाँर बनलाय. गंभीरच्या कॅप्टनसीमध्ये केकेआरनं दोन वेळा आयपीएल विजेतेपद मिळवलंय. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सनं या शर्यतीमध्ये केकेआरला बरंच मागं टाकलंय. पण, गंभीरच्या काळातील त्यांचा एक रेकॉर्ड मोडणं अद्याप कुणालाही जमलेलं नाही.

Advertisement

गंभीरच्या कॅप्टनसीमध्ये केकेआरनं सलग 10 आयपीएल सामने जिंकण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम यापुढेही अबाधित राहण्याची शक्यता आहे. 

Topics mentioned in this article