आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कनं (Mitchell Starc) या सिझनमध्ये पहिल्यांदाच दमदार कामगिरी केली आहे. शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टार्कनं 33 रन देत 4 विकेट्स घेतल्या. आयपीएल 2024 मध्ये स्टार्कनं पहिल्यांदाच त्याच्या लौकिकाला साजेसी बॉलिंग केली. त्याच्या या कामगिरीचं 'लेडी लक' कनेक्शन आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्टार्कची बायको आणि ऑस्ट्रे्लियाच्या महिला टीमची कॅप्टन एलिसा हिली ही मॅच पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होती. हिलीची उपस्थिती स्टार्कसाठी फायदेशीर ठरली. यापूर्वीच्या सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक होती. तो विकेट घेण्यात अपयशी ठरत होताच त्याचबरोबर महागडाही ठरत होता. त्यामुळे स्टार्कला चांगलंच ट्रोल केलं जातं होतं.
मिचेल स्टार्क आणि केकेआरच्या विजयाचा आणखी एक हिरो व्यंकटेश अय्यर यांनी सामना संपल्यानंतर एकमेकांशी चर्चा केली. आयपीएलच्या ऑफिशियल हँडलवरुन या चर्चेचा व्हिडिओ शेअर केलाय. केकेआरच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिल्यानं स्टार्क आणि अय्यर चांगलेच खूश होते. यावेळी 'एलिसाला कुठं लपवलं होतंस?' असा मजेशीर प्रश्न अय्यरनं स्टार्कला विचारला.
( नक्की वाचा : T20 वर्ल्ड कपमध्ये निवड होताच घसरला खेळ, रोहित ते अर्शदीप सारे फेल )
स्टार्कनं यावर 'ती आंतरराष्ट्रीय इव्हेंटमध्ये व्यस्त असल्यानं घरी होती. आता तिथं इथं आलीय. हा आपल्यासाठी चांगला संकेत असेल, अशी आशा आहे,' असं स्टार्कनं सांगितलं.
आयपीएल 2024 मध्ये स्टार्कनं आत्तापर्यंत 9 मॅच खेळले आहेत. त्यामध्ये 33 ची सरासरी आणि 11.40 च्या इकोनॉमी रेटनं 11 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्ध 33 रन देऊन 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.