जाहिरात
Story ProgressBack

T20 वर्ल्ड कपमध्ये निवड होताच घसरला खेळ, रोहित ते अर्शदीप सारे फेल

T20 World Cup 2024 : टीम निवडीनंतर झालेल्या आयपीएल मॅचमध्ये वर्ल्ड कप टीममधील 9 प्रमुख खेळाडू अपयशी ठरले आहेत.

Read Time: 2 mins
T20 वर्ल्ड कपमध्ये निवड होताच घसरला खेळ, रोहित ते अर्शदीप सारे फेल
रोहित शर्मा ते अर्शदीप सिंग हे टीम इंडियाचे 9 खेळाडू फेल गेले आहेत.
मुंबई:

T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या टीमचा कॅप्टन तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) व्हाईस कॅप्टन आहे. 30 एप्रिलला भारतीय टीमची घोषणा झाली. टीम निवडीनंतर झालेल्या आयपीएल मॅचमध्ये वर्ल्ड कप टीममधील 9 प्रमुख खेळाडू अपयशी ठरल्यानं फॅन्सची काळजी वाढली आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (MI vs LSG) हा सामना टीम निवडीनंतर काही तासांमध्ये झाला. या सामन्यात वर्ल्ड कपसाठी निवड झालेल्या टीम इंडियामधील 4 खेळाडू होते. कॅप्टन रोहित शर्माला प्रभाव पाडता आला नाही. तो फक्त 4 रन काढून आऊट झाला. भारताला T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर सूर्यकुमार यादवला दमदार कामगिरी करावी लागेल. लखनौविरुद्ध तो फक्त 10 रन काढून परतला. टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन हार्दिक पांड्याचा खराब फॉर्म लखनौविरुद्धही कायम आहे. त्याला खातंही उघडता आलं नाही. जसप्रीत बुमराहनं 4 ओव्हर्समध्ये फक्त 17 रन्स दिले खरे पण त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) हा सामना झाला. या सामन्यात रविंद्र जाडेजा, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग हे तीन भारतीय खेळाडू होते. आयपीएल सिझनमध्ये फॉर्मात असलेला शिवम दुबे भारतीय टीममध्ये निवड झाल्यानंतरच्या पहिल्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर एकही रन न काढता आऊट झाला.

जाडेजाला सीएसकेनं चौथ्या क्रमांकावर प्रमोशन दिलं होतं. तो फक्त 2 रन करु शकला. त्यानंतर त्यानं 3 ओव्हरमध्ये 22 रन मोजूनही जाडेजाला एकही विकेट मिळवता आली नाही. अर्शदीप सिंगचा खराब फॉर्म सुरुच आहे. सीएसकेचे फलंदाज रन्स काढण्यासाठी झगडत होते. त्याचा अर्शदीपला फायदा उठवता आला नाही. अर्शदीप सिंगनं 4 ओव्हर्समध्ये 13 च्या इकोनॉमी रेटनं 52 रन दिले. 

( नक्की वाचा : हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर आगरकरनं एकाच वाक्यात दिलं उत्तर )

भारतीय टीममधील खेळाडूंचा खराब फॉर्म गुरुवारी (2 मे) सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RR vs SRH) सामन्यात संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहल हे टीम इंडियाचे खेळाडू अपयशी ठरले. संजू सॅमसला भोपाळाही फोडता आला नाही. तर, युजवेंद्र चहलनं 4 ओव्हर्समध्ये 15.50 च्या इकोनॉमी रेटनं 62 रन दिले.

चहलची खराब बॉलिंग टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी वाढवणारी आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वालनं 40 बॉलमध्ये 67 रन काढले. एकट्या यशस्वीचा अपवाद वगळता अन्य वर्ल्ड कप टीममध्ये निवडलेले 9 खेळाडू फेल गेल्यानं भारचीय फॅन्सचं टेन्शन वाढलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
हार्दिक पांड्याच्या प्रश्नावर आगरकरनं एकाच वाक्यात दिलं उत्तर
T20 वर्ल्ड कपमध्ये निवड होताच घसरला खेळ, रोहित ते अर्शदीप सारे फेल
why KL rahul not selected for t 20 world cut team said ajit agarkar
Next Article
केएल राहुलला वर्ल्ड कपमध्ये संधी का नाही मिळाली?, अजित आगरकरने दिलं उत्तर
;