IPL 2024 : धोनीच्या डोळ्यात पाणी होतं, कोच फ्लेमिंगनं सांगितलं ड्रेसिंग रुममधलं वातावरण

जाहिरात
Read Time: 2 mins
Fleming on MS Dhoni Broke Captaincy News: असं होतं CSK ड्रेसिंग रुममधील वातावरण
मुंबई:

MS Dhoni CSK Captaincy News : आयपीएल 2024 सुरु होण्याच्या काही तास आधी महेंद्रसिंह धोनीनं मोठा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला. धोनीनं चेन्नई सुपर किंग्सची कॅप्टनसी सोडली. त्याच्या या निर्णयानं फक्त क्रिकेट फॅन्स नाही तर अनेक दिग्गजांनाही धक्का बसला. सीएसकेचा मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगनं धोनीच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. 

'आम्हाला हा निर्णय पूर्वीपासूनच माहिती होता. आम्ही नवा कॅप्टन तयार करत होतो. भविष्याचा विचार करुन हा निर्णय आवश्यक होता,' असं फ्लेमिंगनं सांगितलं. त्याचबरोबर धोनीनं हा निर्णय सर्व खेळाडूंना पहिल्यांदा कळवला त्यावेळी टीममधील वातावरण कसं होतं? याचं वर्णनही फ्लेमिंगनं केलंय. 

पहिल्यांदा काय घडलं?

'धोनीच्या डोळ्यात पाणी होतं. सर्व काही थांबलंय, अशी परिस्थिती होती. ड्रेसिंग रुममधील प्रत्येकाचे डोळे भरुन आले होते. सर्वजण इमोशनल झाले होते.

या इमोशनल प्रसंगानंतर सर्वजणांनी ऋतुराजचं अभिनंदन केलं. धोनीनं निर्माण केलेली परंपरा तो पुढं नेईल असा आम्हाला विश्वास आहे. धोनीनं पहिल्यांदा कॅप्टनसी सोडली त्यावेळी आम्ही तयार नव्हतो. पण, यंदा आम्हाला सर्व गोष्टी माहिती होत्या.' असं फ्लेमिंगनं सांगितलं.

महेंद्रसिंह धोनीनं यापूर्वी 2022 मध्ये सीएसकेची कॅप्टनसी सोडली होती. त्यावेळी रविंद्र जडेजाची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण, जडेजा कॅप्टन म्हणून अपयशी ठरला. त्यावेळी अर्ध्या सिझननंतर धोनी पुन्हा टीमचा कॅप्टन झाला होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली 2023 मध्ये सीएसकेनं पुन्हा एकदा अजिंक्यपद पटकावलं. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेनं पाचवेळा आयपीएल विजेतेपद पटकावलंय. 

या सिझनमधील पहिला सामना सीएसके आणि आरसीबी (CSK vs RCB) यांच्यात होणार आहे. दोन्ही टीममध्ये आत्तापर्यंत 31 सामने झाले आहेत. त्यापैकी सीएसकेनं 20 तर आरसीबीनं 10 मॅचमध्ये विजय मिळवलाय.

Advertisement
Topics mentioned in this article