आयपीएल 2024 मधून चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) आव्हान संपुष्टात आलंय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 27 रननं पराभव केला. चेन्नईचं आव्हा संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) भवितव्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. धोनी शेवटचा आयपीएल सामना खेळला का? धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार का? याबाबत वेगवेगळी चर्चा सुरु आहे. प्रत्येक जण याबाबत वेगवेगळे आंदाज बांधत आहे. या सर्व चर्चांमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या बड्या अधिकाऱ्यानं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चेपॉक मैदानात आयपीएल ट्रॉफी उंचावण्यात अपयश आल्यानं महेंद्रसिंह धोनी निराश झालाय, अशी माहिती सीएसके मॅनेजमेंटमधील बड्या अधिकाऱ्यानं 'टाईम्स ऑफ इंडिया' शी बोलताना दिली. या पराभावंतर सीएसकेचा कॅम्प सोडणारा धोनी हा पहिला व्यक्ती होता. तो तात्काळ रांचीला निघून गेलाय, अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आलीय.
महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या निवृत्तीबाबत अद्याप कोणतेही संकेट दिले नसल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. मी आयपीएल सोडतोय, असं धोनी अद्याप कुणालाही म्हणालेला नाही. त्यानं काही महिने मॅनेजमेंटला वाट पाहण्यास कळवलं आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली. आम्हाला धोनीच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. तो जो निर्णय घेईल तो टीमच्या हिताचा असेल. त्यानं आजवर नेहमीच संघहिताला प्राधान्य दिलं, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.
( नक्की वाचा : मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो, वाचा कोट्यवधी रुपये घेणाऱ्या खेळाडूचा एक रन-विकेट किती पडली महाग )
महेंद्रसिंह धोनीनं या आयपीएल सिझनपूर्वी कॅप्टनसीचा राजीनामा दिला होता. धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडची सीएसकेचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सिझनमध्ये सीएसकेनं 7 विजयासह 14 पॉईंट्स मिळवले. त्यांना रनरेटच्या आधारावर स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. धोनीनं या सिझनमध्ये 220.54 च्या स्ट्राईक रेटनं 161 रन केले.