जाहिरात

मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो, वाचा कोट्यवधी रुपये घेणाऱ्या खेळाडूचा एक रन-विकेट किती पडली महाग

IPL 2024 Mumbai Indians : मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2024 चा सिझन अत्यंत निराशाजनक ठरला.

मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो, वाचा कोट्यवधी रुपये घेणाऱ्या खेळाडूचा एक रन-विकेट किती पडली महाग
Mumbai Indians : रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा सर्वात महागडा खेळाडू आहे. (फोटो BCCI)
मुंबई:

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2024 चा सिझन अत्यंत निराशाजनक ठरला. मुंबई इंडियन्सनं या सिझनमध्ये फक्त 4 सामने जिंकले. 'प्ले ऑफ' च्या शर्यतीमधून बाहेर पडलेली ती पहिली टीम होती. मुंबई इंडियन्सनं पराभवानं या सिझनची सुरुवात केली. त्याचबरोबर शेवटही पराभवानंच झाला. मुंबई इंडियन्सनं या सिझनच्या सुरुवातीला रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन म्हणून नियुक्त केलं. फ्रँचायझीचा हा निर्णय फॅन्सना आवडला नाही. संपूर्ण सिझन हार्दिकला ट्रोल करण्यात आलं. आता पुढील सिझनपूर्वी यंदा काय चुका झाल्या याचा टीम मॅनेजमेंट नक्की आढावा घेईल. त्याचबरोबर टीमच्या ज्या स्टार खेळाडूंना मोठी रक्कम देऊन करारबद्ध केलं होतं, त्यांनी कशी कामगिरी केली हे देखील पाहावं लागणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मा टीममधल्या सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे.  मुंबईनं रोहित शर्माला 16 कोटींमध्ये करारबद्ध केलंय. रोहितनं या सिझनमधल्या 14 मॅचमध्ये 32.08 ची सरासरी आणि 150 च्या स्ट्राईक रेटनं 417 रन केले. त्यामध्ये एक सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. रोहितला चार इनिंगमध्ये दोन अंकी रनही करता आले नाहीत. मुंबई इंडियन्सला रोहितचा एक रन 3 लाख 83 हजार 693 रुपयांना पडला आहे. 

( नक्की वाचा : एका Video नं माझी वाट लावली! रोहित शर्मानं हात जोडून काय केली विनंती? )
 

इशान किशन

आयपीएल 2022 मधील ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सनं इशान किशनला 15 कोटी 25 लाखांना खरेदी केले होते. इशान किशन रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्सचा दुसरा महागडा खेळाडू होता. त्यानं आयपीएल 2024 मधील 14 मॅचमध्ये 22.86 च्या सराससरीनं आणि 148.84 च्या स्ट्राईक रेटनं 320 रन केले. इशानला संपूर्ण सिझनमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावता आलं. 69 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर होता. इशानला दोन वेळा खातंही उघडता आलं नाही. तर आणखी एकदा त्याला दोन अंकी रन करता आले नाहीत. चांगल्या सुरुवातीचं मोठ्या स्कोअरमध्ये रुपांतर करण्यात त्याला अपयश आले. इशाननं विकेट किपर म्हणून या सिझनमध्ये 9 कॅच घेतले.  मुंबई इंडियन्सला त्याच्या एक रनची किंमत 4 लाख 76 हजार 562 रुपये मोजावी लागली आहे. 


हार्दिक पांड्या

मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्यावर मोठा विश्वास दाखवला होता. या सिझनपूर्वी हार्दिकला गुजरात टायटन्सकडून 15 कोटींमध्ये खरेदी केलं होतं. त्याचबरोबर गुजरात ट्रान्सफर फी देखील देण्यात आली होती. ही फी किती हे उघड झालेलं नाही. पण, काही रिपोर्टनुसार जवळपास 50 कोटी रुपये मुंबई इंडियन्सनं मोजले होते. त्यानंतर हार्दिकला थेट कॅप्टन करण्यात आलं. पण, हार्दिकनं मुंबईला सपेशल निराश केलं.  

हार्दिक कॅप्टन आणि खेळाडू या दोन्ही आघाड्यावर अपयशी ठरला. त्यानं या सिझनमधल्या 14 मॅचमध्ये 18 ची सरासरी आणि 143.05 च्या स्ट्राईक रेटनं 216 रन केले. त्याला एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. त्याचबरोबर त्यानं 387 रन देऊन 11 विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याचा एक रन 6 लाख 94 हजार 444 रुपयांना पडला. तर 1 विकेटसाठी जवळपास 1 कोटी 36 लाख, 36 हजार 363 रुपये मोजावे लागले. 

( नक्की वाचा : T20 World Cup : रोहित आणि आगरकरच्या मनाविरुद्ध झाली हार्दिक पांड्याची निवड! )
 

जसप्रीत बुमराह

टीम इंडियाचा प्रमुख फास्ट बॉलर असलेला बुमराह या सिझनमधला मुंबईचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्स बुमराहला 12 कोटी रुपये देते. त्यानं या सिझनमधल्या 13 मॅचमध्ये 20 विकेट्स घेतल्या. त्यासाठी फक्त 336 रन दिले. या सिझनमध्ये ज्या बॉलर्सनी दोन पेक्षा जास्त मॅचमध्ये बॉलिंग केलीय त्यामध्ये बुमराहचा इकोनॉमी रेट सर्वात चांगला आहे. बुमराहनं या सिझनमध्ये 6.48 च्या इकोनॉमी रेटनं रन्स दिले. बुमराहनं या सिझमध्ये 149  बॉल निर्धाव टाकले. तो या सिझनमध्ये सर्वाधिक निर्धाव बॉल टाकणारा खेळाडू आहे. त्याचबरोबर एका मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सला बुमराहची एक विकेट 6 लाखांना पडली. 

( नक्की वाचा : जसप्रीत बुमराह करत होता कॅनडात स्थायिक होण्याचा विचार )

टीम डेव्हिड

टीम डेव्हिड या सिझनमधला मुंबई इंडियन्सचा पाचवा महागडा खेळाडू होता. त्याला या सिझनमध्ये 8 कोटी 25 लाख देण्यात आले आहेत. डेव्हिडनं 13 मॅचमध्ये 30.13 च्या सरासरीनं आणि 158.55 च्या स्ट्राईक रेटनं 241 रन केले. त्याला या सिझनमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. मुंबई इंडियन्सला टीम डेव्हिडच्या एका रनसाठी 3 लाख 42 हजार 323 रुपये मोजावे लागले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: