'तो एकतर माझी बॅट तोडतो किंवा पाय', 'या' बॉलरला 2-3 वर्षांपासून खेळला नाही सूर्या

IPL 2024 Suryakumar Yadav : सूर्यानं जगभरातील बॉलर्सच्या मनात धडकी भरवली आहे. पण, एका बॉलरला नेटमध्ये खेळायला त्याला आवडत नाही. '

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Suryakumar Yadav : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (MI vs RCB) या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवनं झंझावती खेळ केला. त्यानं फक्त 19 बॉलमध्ये 52 रन काढले.सूर्यानं त्याच्या खेळीत 5 फोर आणि 4 सिक्स लगावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं हा सामना 15.3 ओव्हर्समध्येच जिंकला. त्यापूर्वी आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 196 रन केले होते. मुंबईला हे लक्ष्य आव्हानात्मक असेल असा अंदाज होता. पण, सूर्यानं फक्त 19 बॉल्सच्या इनिंगमध्ये मॅचचं चित्र बदललं. त्यानं 273.68 च्या स्ट्राईक रेटनं रन केले.  

या मॅचनंतर सूर्यानं त्याच्या खेळीबद्दल सांगितलं. ' मी पहिल्यांदा जे शॉट्स खेळू शकतो त्याचा विचार करतो. त्याचा नेटमध्ये अभ्यास करतो. त्यानंतर खेळाच्या परिस्थितीप्रमाणे बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतो. मी खेळ कसा बदलू शकतो याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये यश मिळालं तर खूप छान. अन्यथा पुढच्या मॅचमध्ये पुन्हा नव्यानं प्रयत्न करतो,' असं सूर्यानं स्पष्ट केलं. 

सूर्यानं जगभरातील बॉलर्सच्या मनात धडकी भरवली आहे. पण, एका बॉलरला नेटमध्ये खेळायला त्याला आवडत नाही. '

जियो सिनेमा'वर बोलताना सूर्यानं त्या बॉलरचं नाव सांगितलं. सूर्यानं जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सर्वात धोकादायक बॉलर असल्याचं म्हंटलं आहे. 'मला त्याला नेटमध्येही खेळायला आवडत नाही. तो एकतर माझी बॅट तोडतो किंवा पाय. त्याच्या विरुद्ध खेळणं म्हणजे एक पर्वत चढण्यासारखं आहे. मी त्याचा सामना करुन 2 ते 3 वर्ष झाली आहेत'

अशी कबुली सूर्यानं दिली.

जसप्रीत बुमराह करत होता कॅनडात स्थायिक होण्याचा विचार
 

जसप्रीत बुमराहनं आरसीबीविरुद्ध जबरदस्त बॉलिंग करत फक्त 21 रन्समध्ये 5 विकेट्स घेतल्या. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या बॉलरला आरसीबीविरुद्ध 5 विकेट्स घेण्यात यश आलंय. मुंबई इंडियन्सच्या विजयात आरसीबीचं महत्त्वाचं योगदान होतं. त्याला या कामगिरीबाबत 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मुंबई इंडियन्सनं घरच्या मैदानावर सलग दोन सामने जिंकले आहेत. त्यांचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध रविवारी संध्याकाळी (14 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

(सौजन्य : भाषा इनपूट)