Jasprit Bumrah : भारतीय क्रिकेट टीमला (Team India) फास्ट बॉलिंगमधील महासत्ता बनवण्यात जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) मोठा वाटा आहे. बुमराहनं मुंबई इंडियन्सकडून आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं. आयपीएल गाजवल्यानंतर तो टीम इंडियातही स्थिरावला. भारतीय टीमचं त्यानं नेतृत्त्वही केलं आहे. देशातील अनेक तरुण फास्ट बॉलर्सचा तो आदर्श आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारात त्यानं अचूकता आणि खास बॉलिंग शैलीनं स्वत:चा दरारा निर्माण केला आहे.
टीम इंडियाचा आधारस्तंभ असलेला जसप्रीत बुमराह हा एकेकाळी चांगल्या संधीच्या शोधासाठी कॅनडामध्ये जाण्याच्या विचारात होता. बुमराहची पत्नी संजना गणेशननं त्याला एकदा कॅनडामध्ये जाण्याबद्दल विचारलं होतं. त्यावेळी त्यानं हा खुलासा केला होता.
आयपीएल सुरु असतानाच मुंबई इंडियन्सनं बदलला एक खेळाडू
'इथं प्रत्येक गल्लीत देशासाठी खेळण्याची इच्छा असलेली 25-25 मुलं मिळतील. त्यामुळे तुमच्याकडं बॅकअप प्लॅन असणे आवश्यक आहे. माझे काका तिथं राहतात. त्यामुळे मी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॅनडामध्ये शिफ्ट होण्याचा विचार केला होता. आमचं पूर्ण कुटुंब कॅनडात जाणार होतं. पण, माझी आई या प्रकारच्या सांस्कृतिक बदलासाठी तयार नव्हती. मी माझ्या करियरमध्ये यशस्वी झालो. अन्यथा, मी कॅनडा टीमसाठी क्रिकेट किंवा अन्य काम करत असतो. मी भारतीय टीम आणि मुंबई इंडियन्सकडून खेळतो, याचा मला आनंद आहे.' असं बुमराहनं 'जिओ सिनेमा' ला बोलताना सांगितलं.
बुमराहची कारकिर्द
बुमराहनं 2016 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं आत्तापर्यंत 36 टेस्ट मॅचमध्ये 159 विकेट्स घेतल्या आहेत. तर 89 वन-डे मॅचमध्ये 149 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. त्याचबरोबर भारताकडून 62 टी20 सामने तो खेळला असून त्यामध्ये त्यानं 74 विकेट्स घेतल्या आहेत. तो गेल्या 12 वर्षांपासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. त्यानं या फ्रँचायझीसाठी 124 मॅचमध्ये 150 विकेट्स घेतल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world