Nitish Reddy; PBKS vs SRH: आयपीएल 2024 मधील 23 वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये झाला. या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या सनरायझर्सकडून नितीश कुमार रेड़्डीनं सर्वाधिक 64 रन काढले. आंध्र प्रदेशच्या 20 वर्षांच्या खेळाडूनं टीम संकटात असताना हाफ सेंच्युरी झळकावत स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली. सनरायझर्सच्या विजयाचा तो हिरो ठरलाच. त्याचबरोबर आयपीएलच्या इतिहासात आजवर कुणालाही न जमलेला रेकॉर्डही त्यानं नोंदवला आहे.
कोण आहे नितिश रेड्डी?
नितीश आंध्र प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्यानं आत्तापर्यंत 17 फर्स्ट क्लास आणि 22 लिस्ट A मॅच खेळल्या आहेत. त्याला SRH नं 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केले होते. पंजाब किंग्ज विरुद्ध त्याचा आयपीएलमधील दुसरा सामना होता. त्यामध्ये त्यानं 37 बॉलमध्ये 4 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं 64 रन काढले. हा त्याचा आयपीएल कारकिर्दीमधील सर्वोच्च स्कोअर आहे. पंजाबविरुद्ध सनरायझर्सच्या एकाही खेळाडूला 25 पेक्षा जास्त रन करता आले नाहीत. त्यावेळी त्यानं 64 रनची खेळी करत पंजाबला 183 रन्सचं आव्हान दिलं.
पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही. टॉप ऑर्डरच्या अपयशानंतर शशांक सिंह ( 25 बॉल 46) आणि आशुतोष शर्मा (15 बॉल 33) यांनी जोरदार प्रतिकार केला. शशांक-आशुतोषच्या प्रतिकारामुळे शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगतदार झाला. पण, पंजाबला विजय मिळवण्यात अपयश आलं.
Shashank Singh : पंजाबच्या नव्या हिरोचं आहे मुंबईशी कनेक्शन
नितिशचा दमदार रेकॉर्ड
नितिशनं या सामन्यात अर्धशतक झळकावलंच. त्याचबरोबर आजवर कुणालाही न जमलेला रेकॉर्ड केला. आयपीएलच्या कोणत्याही सामन्यात अर्धशतक एक विकेट आणि एक कॅच घेणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. नितिशनं 3 ओव्हर्समध्ये 33 रन्स देत जितेश शर्माची महत्त्वाची विकेट घेतली. त्याचबरोबर प्रबसिमरण सिंगचा कॅच घेतला. नितिशनं 20 वर्ष 319 दिवस हे वय असताना हा ऑल राऊंड रेकॉर्ड केलाय.
नव्या रेकॉर्डनंतर 'ती' गोष्ट आठवून ऋतुराज भावुक, धोनीबद्दल म्हणाला...
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अर्धशतक झळकवणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा तरुण खेळाडू बनलाय. राजस्थान रॉयल्सच्या रियान परागच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. त्यानं 19 वर्ष 307 दिवस हे वय होतं त्यावेळी आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.