जाहिरात
Story ProgressBack

नव्या रेकॉर्डनंतर 'ती' गोष्ट आठवून ऋतुराज भावुक, धोनीबद्दल म्हणाला...

Read Time: 2 min
नव्या रेकॉर्डनंतर 'ती' गोष्ट आठवून ऋतुराज भावुक, धोनीबद्दल म्हणाला...
Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडनं मॅच संपल्यानंतर मोठं वक्तव्य केलं. (फोटो सौजन्य : BCCI/IPL)
चेन्नई:

चेन्नई सुपर किंग्सची सलग दोन पराभवानंतर घसरलेली गाडी पुन्हा एकदा रुळावर आलीय. चेन्नईनं सोमवारी (8 एप्रिल)  घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (CSK vs KKR) 7 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईच्या अचूक बॉलिंगपुढं केकेआरला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 137 पर्यंतच मजल मारता आली होती. चेन्नईनं 138 रन्सचं आव्हान 7 विकेट्स राखून सहज पूर्ण केलं. चेन्नईचा या सिझनमधील हा तिसरा विजय आहे. 

ऋतुराजचा रेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. ऋतुराजनं 58 बॉलमध्ये नाबाद 67 रन्स केले. हा आयपीएल सिझन सुरु होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं सीएसकेची कॅप्टनसी ऋतुराजकडं सोपावली होती. पाचवेळा आयपीएल जिंकणाऱ्या टीमचा कॅप्टन झाल्यापासून ऋतुराजची ही पहिलीच हाफ सेंच्युरी आहे.

चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये पाच वर्षांनंतर हाफ सेंच्युरी करणारा ऋतुराज हा पहिला कॅप्टन ठरलाय. महेंद्रसिंह धोनीनं 2019 मध्ये सीएसकेचा कॅप्टन म्हणून हाफ सेंच्युरी लगावली होती. धोनीनं 2022 साली देखील पन्नाशी पार केली होती. पण, त्यावेळी रविंद्र जडेजा कॅप्टन होता.  

ऋतुराज भावुक

सीएसकेच्या विजयानंतर बोलताना ऋतुराज भावुक झाला होता. तो म्हणाला, 'मला जुन्या गोष्टी आठवल्या. आयपीएलमध्ये मी पहिलं अर्धशतक झळकावलं होतं तेव्हा देखील माही भाई माझ्यासोबत मॅच फिनिश करण्यासाठी मैदानात होता.' 

यावेळी, संथ बॅटिंग करण्याच्या प्रश्नावरही त्यानं उत्तर दिलं. 'अजिंक्य (रहाणे) जखमी झाल्यानं माझ्यावर जबाबदारी होती. मला टीममधील अन्य खेळाडूंना अडचणीत टाकायचं नव्हतं. मी संथ सुरुवात केली असं म्हणणार नाही. टी20 मध्ये तुम्ही अनेकदा एक किंवा दोन बॉलमध्ये चित्र बदलवू शकता. कधी-कधी तुम्हाला पुढं जाण्यासाठी थोडं नशीबही आवश्यक असतं. क्रिकेट तज्ज्ञ माझ्या स्ट्राईक रेटवर जास्त बोलतील.'

Shashank Singh पंजाबच्या नव्या हिरोचं आहे मुंबईशी कनेक्शन
 

सीएसकेचा सहज विजय

या सामन्यात सीएसकेनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. रविंद्र जडेजा आणि तुषार देशापांडे यांच्या अचूक गोलदांजीपुढं केकेआरला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 137 रन्स केले. केकेआरकडून श्रेयस अय्यरनं 34 तर सुनील नरेननं 27 रन्स काढले. जडेजानं 18 रन्स देत 3 तर तुषारनं 33 रन्सच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या.  

धोनीच्या डोळ्यात पाणी होतं, कोच फ्लेमिंगनं सांगितलं ड्रेसिंग रुममधलं वातावरण

139 रन्सचा पाठलाग करताना कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं सर्वाधिक 67 रन्स काढले. या खेळीत त्यानं 9 फोर लगावले. शिवम दुबेनं 28 रन्सची आक्रमक खेळी खेळली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination