IPL 2024 : KKR च्या यशाचं मुंबई कनेक्शन, 3 मुंबईकरांशिवाय अशक्य होतं विजेतेपद!

IPL 2024 KKR : केकेआरला गेल्या 9 सिझनमध्ये विजेतेपदानं हुलकावणी दिली. त्यांना या सिझनमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात 3 मुंबईकरांचं मोठं योगदान आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
IPL 2024 : केकेआरनं सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सनं पराभव करत विजेतेपद पटकावलं. (फोटो BCCI/IPL)
मुंबई:


कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) 10 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवत आययपीएल 2024 मध्ये विजेतेपद पटकावलं. केकेआरनं यापूर्वी 2012 आणि 2014 मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. या सिझनमध्ये त्यांनी सुरुवातीपासून दमदार खेळ केला. चेन्नईत रविवारी (26 मे) रोजी झालेल्या फायनलमध्ये त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा (KKR vs SRH, IPL 2024 Final) 8 विकेट्सनं पराभव केला.  केकेआरच्या भेदक बॉलिंगपुढं सनरायझर्स हैदराबादची इनिंग फक्त 113 रन्सवर संपुष्टात आली. केकेआरनं 114 रनचं आव्हान 57 बॉल आणि 8 विकेट्स राखून जिंकत विजेतेपद पटकावलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

केकेआरला  गेल्या 9 सिझनमध्ये  विजेतेपदानं हुलकावणी दिली. त्यांना या सिझनमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात 3 मुंबईकरांचं मोठं योगदान आहे.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल कारकिर्दी सुरु केलेल्या श्रेयसला आयपीएल 2022 मध्ये 12 कोटी 25 लाख रुपयांना केकेआरनं खरेदी केलं होतं. श्रेयसच्या कॅप्टनसीमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल 2020 मध्ये फायनलपर्यंत धडक मारली होती. आयपीएल 2022 मध्ये श्रेयसला केकेआरला विजेतेपद मिळवून देता आलं नाही. मागील सिझन तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता.

वन-डे वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर श्रेयसचा फॉर्म ढासळला. त्यातच तो दुखापतीमुळे आयपीएलपूर्वी स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर होता. बीसीसीआयनं करारबद्ध केलेल्या खेळाडूंच्या यादीतूनही श्रेयसला वगळण्यात आलं. आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी देखील त्याची निवड झाली नाही. या सर्व घडामोडींचा श्रेयसनं केकेआरच्या कॅप्टनसीवर परिणाम होऊ दिला नाही.

( नक्की वाचा : 5 कारणांमुळे गौतम गंभीर होऊ शकतो टीम इंडियाचा कोच )
 

हर्षित राणा, वैभव अरोरा या नवोदीत बॉलर्सची हातळणी ते सुनील नरीन-आंद्रे रसेल या अनुभवी खेळाडूंचा मैदानात पूर्ण वापर करण्यात श्रेयस कॅप्टन म्हणून सरस ठरला. श्रेयसनं 15 सामन्यात 146.86 च्या स्ट्राईक रेटनं 351 रन केले.  बॅटिंगपेक्षा कॅप्टसीसाठी हा सिझन श्रेयसच्या लक्षात राहणार आहे. त्याच्या या कॅप्टनसीचा केकेआरच्या विजेतेपदात मोठा वाटा होता.

Advertisement

चंद्रकांत पंडित  (Chandrakant Pandit)

आयपीएल विजेतेपद पटकावणारे चंद्रकांत पंडित हे दुसरे भारतीय हेड कोच ठरले आहेत. यापूर्वी फक्त आशिष नेहरा (गुजरात टायटन्स, 2022) याला ही कामगिरी करता आली होती. पंडित 2023 साली केकेआर मुख्य प्रशिक्षक बनले.  देशांतर्गत क्रिकेटचं सखोल ज्ञान आणि कुशल रणनीतीकार म्हणून पंडित ओळखले जातात.  प्रत्येक सामन्यात नवे प्रयोग करणारी केकेआर पंडित यांच्या आगमनानंतर स्थिर बनली.

या संपूर्ण सिझनमध्ये केकेआरनं प्रतिस्पर्धी टीमपेक्षा एक पाऊल पुढचा विचार केला. नैसर्गिक खेळाला मुरड न घालता आक्रमक खेळ करणे आणि मोठ्या सामन्यात कामगिरी उंचवणे ही पंडित यांच्या कोचिंगची स्टाईल आहे. केकेआरला त्याचा फायदा झाला.

Advertisement

( नक्की वाचा : कोलकाताने 10 वर्षानंतर पटकावलं आयपीएलचं जेतेपद, हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव )
 

मुंबईतूनच क्रिकेट कारकिर्द सुरु केलेले चंद्रकांत पंडित हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये 'परीस स्पर्श' लाभलेले कोच म्हणून ओळखले जातात. मुंबई, विदर्भ आणि मध्य प्रदेश या तीन टीमनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली रणजी विजेतेपद पटकावले आहे. आता केकेआरलाही विजेतेपद मिळवून देत जगातील सर्वात बलाढ्य T20 लीगमध्येही पंडित यांनी स्वत:चा ठसा उमटवला आहे.

अभिषेक नायर (Abhishek Nayar)

आयपीएल प्ले ऑफ आणि फायनलमध्ये आक्रमक हाफ सेंच्युरी झळकावत मॅचचा निकाल स्पष्ट करणारा व्यंकटेश नायर असो अथवा केकेआरकडून या सिझनमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वरुण चक्रवर्ती या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीचं श्रेय अभिषेक नायरला दिलं. मुंबईकर अभिषेक केकेआरचा असिस्टंट कोच आहे. त्याच्या मार्गदर्शनाचाही खेळाडूंना मोठा फायदा झाला.

Advertisement

व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती प्रमाणेच रिंकू सिंह आणि अंगीकृश रघुवंशी यांनी देखील यापूर्वी त्यांच्या जडणघडणीत अभिषेक नायरचा असलेला वाटा मान्य केलाय. भारताचा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकच्या कारकिर्दीला संजीवनी देण्यातही अभिषेकचं योगदान आहे. 

( नक्की वाचा: Natasha Stankovic: 'कुणीतरी रस्त्यावर...' घटस्फोटाच्या चर्चेत हार्दिकच्या पत्नीच्या पोस्टनं खळबळ )
 

अभिषेक 2018 पासून केकेआरमध्ये आहे. ही टीम ऑक्शनमध्ये निवडण्यात आणि त्यांना एकत्र बांधण्यात त्याचा वाटा आहे. केकेआरनं अभिषेकवर दाखवलेला विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. केकेआरच्या आयपीएल विजेतेपदात महत्त्वाचं योगदान असलेला अभिषेक हा तिसरा मुंबईकर आहे.

Topics mentioned in this article