यंदाचं आयपीएल अनकॅप्ड खेळाडूंनी खऱ्या अर्थाने गाजवलंय. राजस्थान रॉयल्सकडून रियान पराग सातत्याने संघासाठी जबरदस्त कामगिरी करत आहे. दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्ससाठी तुषार देशपांडे, मुंबई इंडियन्ससाठी नेहल वढेरा, पंजाब किंग्सकडून शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांनी संपूर्ण आयपीएलमध्ये हवा केलीय.
या खेळाडूंव्यतिरिक्त एक असा खेळाडून आहे, ज्याने हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांचं टेन्शन वाढवलं आहे. नितीश रेड्डी या खेळाडूचं नाव आहे. नितीशने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना लक्षवेधी असा ऑल राऊंडर खेळ दाखवला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नितीशची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी
नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांच्या सारखाच जलद गोलंदाज ऑल राऊंडर आहे. यंदाच्या सीजनमध्ये नितीशने हैदराबादसाठी एकूण 7 सामने खेळले आहेत. यामध्ये 6 डावांमध्ये त्याने 54.75 च्या सरासरीने 219 धावा केल्या आहेत. यामध्ये नितीशने दोन अर्धशतके झळकावली आहेत. यंदाच्या सीजनमध्ये नितीशने 76 धावांची नाबाद सर्वोत्तम खेळी केली आहे.
गोलंदाजीबाबत बोलायचं तर नितीशने सात सामन्यांमध्ये 4 डावात गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 23.33 च्या सरासरीने 3 विकेट्स घेतल्या आहेत. नितीशची गोलंदाजी आणि फलंदाजी पाहता भविष्यात त्याला टीम इंडियामध्ये देखील संधी मिळू शकते.
(नक्की वाचा- केएल राहुलला वर्ल्ड कपमध्ये संधी का नाही मिळाली?, अजित आगरकरने दिलं उत्तर)
डोमेस्टिक क्रिकेटमधील नितीशची कामगिरी
नितीशने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 17 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 28 डावांमध्ये त्याने 20.96 च्या सरासरीने 566 धावा कुटल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 22 सामन्यांत 15 डावांमध्ये 36.63 च्या सरासरीने 403 धावा तर टी 20 क्रिकेटमध्ये 10 डावांमध्ये 38.87 च्या सरासरीने 311 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
नितीशच्या नावे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतके आहेत. तर नितीशने फर्स्ट क्लासमध्ये 52 विकेट्स, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 14 विकेट्स आणि टी 20 क्रिकेटमध्ये 3 विकेट्स आहेत.