IPL 2025 : सेल्फी काढायला आलेल्या फॅन्ससोबत रियान पराग अत्यंत चुकीचा वागला, पाहा VIDEO

Riyan Parag : राजस्थान रॉयल्सने रविवारी यंदाच्या सीजनाचा पहिला विजय नोंदवला. या विजयानंतरही लोक कर्णधार रियान परागला ट्रोल करत आहेत. त्याचं कारणंही तसंच आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Riyan Parag : यश मिळाले म्हणून हवा डोक्यात जाऊ देऊ नका, असं विविध क्षेत्रातील यशस्वी लोक नेहमी सांगतात. मात्र काहींच्या डोक्यात यशाच्या पहिल्या पहिलीवरच हवा जाते. रियान परागचंही बहुतेक तेच झालं असावं. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी, रोहित शर्मा आणि असे बरेच सुपरस्टार भारतीय क्रिकेटने दिले. मात्र या खेळाडूंनी लोकांसमोर अथवा फॅन्ससमोर फुकटचा माज दाखवला, असं क्वचितच दिसलं असेल. म्हणून या खेळाडूंचे फॅन्सही कट्टर आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दुसरीकडे आता कुठे नावारुपाला आलेल्या रियान परागचा भलताच अॅटिड्युड दिसून येत आहे.  राजस्थान रॉयल्सने रविवारी यंदाच्या सीजनाचा पहिला विजय नोंदवला. या विजयानंतरही लोक कर्णधार रियान परागला ट्रोल करत आहेत. त्याचं कारणंही तसंच आहे. 

झालं असं की, रियान पराग त्याच्या होमग्राउंड गुवाहाटीमध्ये खेळत होता. अर्थातच रियान पराग तिथे लोकप्रिय आहे. या सामन्यानंतर काही चाहते रियान परागकडे आले आणि त्यांनी त्याच्याकडे सेल्फी काढण्यासाठी फोन दिला. यानंतर रियानने सेल्फीही काढला. मात्र यानंतर रियनने ज्या पद्धतीने फॅन्सना त्यांचा फोन परत केला ते पाहून लोक संतापले आहेत. 

(नक्की वाचा - CSK vs RR : धोनी बाद झाल्यानंतर तरुणीची भन्नाट रिअ‍ॅक्शन, रातोरात सोशल मीडियावर व्हायरल; पाहा VIDEO)

Advertisement

सेल्फी काढल्यानंतर, रियानने अतिशय विचित्र पद्धतीने फोन चाहत्यांकडे फेकला. कसा तरी एका चाहत्याने फोन पकडला. त्याच्या एकंदर कृतीतून त्याने हे चुकून केले असं कुठेही जाणवलं नाही. चाहत्यांना रियानचा हा अॅटिट्युड अजिबात आवडला नाही. रियान पराग तितका मोठा खेळाडू  देखील नाही, त्यामुळे त्याचे चाहते आहेत यातच त्याने खूश व्हायला हवं. रियानला डोक्यावर घेतलेले चाहते त्याला कधी जमिनीवर आपटतील हे त्याला कळणारही नाही.  

(नक्की वाचा- RR Vs CSK: ऋतुराजची वादळी खेळी व्यर्थ! अटीतटीच्या लढतीत राजस्थानचा विजय)

रियान परागची कामगिरी

रियान परागने आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत काही खास कामगिरी केलेली नाही. तीन सामन्यांमध्ये त्याने फक्त 66 धावा केल्या आहेत. सामन्यात त्याने निश्चितच 37 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. त्याच्याशिवाय नितीश राणाने 36 चेंडूत 81 धावांचे योगदान दिले. ज्यामुळे राजस्थान संघाने 20 षटकांत 182 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, चेन्नई संघाने सामना 6 धावांनी गमावला. 

Advertisement