
IPL 2025 RR Vs CSK: आयपीएल स्पर्धेतील 11 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये पार पडला. या लढतीत राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा धुव्वा उडवला. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावा केल्या. प्रत्यूत्तरात चेन्नई सुपर किंग्सचा डाव 176 धावांवर आटोपला. चेन्नईसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी केली. त्याने 44 चेंडूंमध्ये 63 धावा कुटल्या.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजस्थानच्या 183 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. चेन्नईची पहिली विकेट रचिन रवींद्रच्या रूपाने पडली. तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठी 23 धावांवर आणि शिवम दुबे 10 चेंडूंमध्ये 18 धावा करुन बाद झाला. कर्णधार ऋतुराजने शानराद अर्धशतक शतक करत संघाचा डाव सावरला पण तो टीम विजयी करु शकला नाही. अखेरच्या षटकात महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जडेजाने फटकेबाजी केली मात्र त्यांची खेळी व्यर्थ ठरली.
Match 11. Rajasthan Royals Won by 6 Run(s) https://t.co/V2QijpWpGO #RRvCSK #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
तत्पुर्वी, बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 11 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. राजस्थानला नितीश राणाने 81 धावांची जलद खेळी करत शानदार सुरुवात करुन दिली होती. 12 षटकांनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोअर 129 होता. यानंतर, चेन्नईच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले.
दरम्यान, रवींद्र जडेजाने 13 व्या षटकात फक्त 5 धावा दिल्या. यानंतर, नूर अहमदने 14 व्या षटकात फक्त 6 धावा दिल्या आणि ध्रुव जुरेलची विकेटही घेतली. हसरंगाच्या विकेटसह, जडेजाने 15 व्या षटकात फक्त 5 धावा दिल्या. ज्यामुळे राजस्थानच्या धावसंख्येला ब्रेक लागला. चेन्नईकडून खलील अहमदने 4 षटकांत 38 धावा देत 2 बळी घेतले. नूर अहमदने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 28 धावा देत 2 बळी घेतले. पाथिरानानेही 4 षटकांत 2 बळी आणि 28 धावा दिल्या. अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
DC Vs SRH: सुपर संडेच्या लढतीत दिल्लीचा दबदबा.. हैदराबादचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world