IPL 2025 , CSK vs DC : चुकीला माफी नाही ! अक्षर पटेलनं विकेट किपरवर भर मॅचमध्ये केली कारवाई

IPL 2025, Chennai Super Kings vs Delhi Capitals : या मॅचमध्ये दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेलनं (Axar Patel) केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

IPL 2025, Chennai Super Kings vs Delhi Capitals : आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची विजयी घौडदौड सुरुच आहे. चेन्नईमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं यजमान टीमचा 25 रननं पराभव केला. चेन्नई सुपर किंग्सला तब्बल 15 वर्षांनी घरच्या मैदानावर पराभूत करण्याचा विक्रम दिल्ली कॅपिटल्सनं केला. या मॅचमध्ये दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेलनं (Axar Patel) केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अक्षर पटेलनं केली कारवाई

दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेलनं त्यांचा विकेट किपर अभिषेक परोलवर कारवाई केली. त्यानं अभिषेकला खराब विकेट किपिंग केल्याबद्दल किपिंगमधून काढलं. त्यानंतर केएल राहुलनं पुढील मॅचमध्ये ती जबाबदारी पार पाडली.

सीएसकेच्या इनिंगमधील तिसऱ्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. दिल्लीकडून मिचेल स्टार्कनं ती ओव्हर टाकली. त्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाड आऊट झाल्यानंतर विजय शंकर क्रिजवर आला होता. विजय शंकरनं फक्त दोन बॉलचा सामना केला होता. त्यावेळी मिचेल स्टार्कनं टाकलेला इनस्विंगर थेट विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला लागला. त्यानंतर स्टार्कनं LBW चं अपिल केलं. अंपायरनं ते अपिल फेटाळलं. 

( नक्की वाचा : IPL 2025 : मुंबई इंडियन्समध्ये काय चाललंय? भर मॅचमध्ये 'सूर्या'चा पारा चढला, कोचला घ्यावी लागली धाव! )
 

मिचेलनं अभिषेकला बॉल पूर्वी कुठं लागला हे विचारलं. त्यानं पहिल्यांदा बॅटला लागल्याचा इशारा केला. त्यानंतर अक्षर पटेलनं किपरच्या सल्ल्यानुसार रिव्ह्यू घेण्यास नकार दिला. ट्रिस्टन स्टब्स डीआरएस घेण्याचा आग्रह करत होता. पण, अक्षर पटेलनं अभिषेकच्या सल्ल्यानुसार रिव्ह्यू घेतला नाही. त्यानंतर रिप्लेमध्ये विजय शंकर साफ आऊट असल्याचं स्पष्ट झालं. 

Advertisement

त्यानंतर अक्षरनं अभिषेकला या चुकीची शिक्षा दिली. त्यानं अभिषेकला विकेट किपिंगवरुन हटवलं आणि केएल राहुलला ती जबाबदारी दिली. विजय शंकरनं या जीवदानाचा चांगलाच फायदा उठवला. त्यानं नाबाद 69 रन केले. 

विजय शंकर आणि महेंद्रसिंह धोनीनं सहाव्या विकेटसाठी नाबाद 84 रनची भागिदारी केली. सीएसकेच्या इतिहासात सहाव्या विकेटसाठी ही रेकॉर्ड भागिदारी आहे. अर्थात ही विक्रमी भागिदारी देखील सीएसकेचा पराभव टाळू शकली नाही. त्यांना सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. 

Advertisement
Topics mentioned in this article