IPL 2025 Final : RCB फॅन्समध्ये लोकप्रिय असलेल्या 'EE Sala Cup Namade' या घोषणेचा अर्थ काय?

 EE Sala Cup Namade : प्रत्येक आयपीएल सिझन सुरु असताना आरसीबी फॅन्स ही घोषणा देत असतात. ही घोषणा आरसीबी फॅन्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

IPL 2025 Final, RCB vs PBKS : आयपीएल 2025 मधील फायनल मंगळवारी (3 जून) होणार आहे. या फायनलचं काऊंट डाऊन सुरु झालंय. यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब सुपर किंग्स (Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings) यांच्यात फायनल होणार आहे. आरसीबीनं प्ले ऑफमध्ये पंजाब किंग्जचा 6 विकेट्सनं पराभव केला. तर या पराभवातून सावरत पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सनं पराभव करत फायनल गाठली. दोन्ही टीमनं आजवर एकदाही आयपीएल जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार हे नक्की आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आयपीएलमधील लोकप्रिय टीममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा समावेश आहे. विराट कोहली (Virat Kohli) हा जागतिक क्रिकेटचा सुपरस्टार आरसीबीकडून आयपीएलच्या पहिल्या सिझनपासून खेळतो. विराट कोहलीसह राहुल द्रविड, अनिल कुंबळे, झहीर खान, युवराज सिंह,  ख्रिस गेल, एबी डीव्हिलियर्स, केव्हिन पीटरसन, ग्लेन मॅक्सवेल, फाफ ड्यू प्लेसिस यासारखे दिग्गज क्रिकेटपटू आजवर आरसीबीकडून खेळले आहेत. पण, त्यांना नेहमीच विजेतेपदानं हुलकावणी दिली आहे.

आयपीएल फायनलमध्ये प्रवेश करण्याची आरसीबीची ही चौथी वेळी आहे. त्यांनी यापूर्वी 2008, 2011 आणि 2016 असं तीन वेळा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण, या सर्व फायनलमध्ये त्यांना पराभव सहन करावा लागला. आता चौथ्यांदा आपली टीम फायनल नक्की जिंकेल असा विश्वास आरसीबीच्या फॅन्सना आहे.

( नक्की वाचा : 'मी टीमला निराश करत होतो', पंजाब किंग्जच्या दिग्गजाची अचानक निवृत्ती )
 

प्रत्येक आयपीएल सिझन सुरु असताना आरसीबी फॅन्स  EE Sala Cup Namade ही घोषणा देत असतात. ही घोषणा आरसीबी फॅन्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. हे टीमचं अनधिकृत घोषवाक्य मानलं जातं. आरसीबीचे फॅन्स मोठ्या उत्साहानं ही घोषणा देतात. तर अन्य टीमचे फॅन्स त्यांना चिडवण्यासाठी या घोषणेचा वापर करतात. या घोषणेच्या आधारानं अनेक मीम्स, व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल आहेत.

Advertisement

काय आहे अर्थ?

जगभरातील आरसीबी फॅन्स EE Sala Cup Namade ही घोषणा मोठ्या श्रद्धेनं देतात. त्यामुळे सर्व क्रिकेट फॅन्सना ही घोषणा माहिती आहे. पण, याचा अर्थ सर्वांना माहिती नाही. हा एक कन्नड शब्द आहे. त्याचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

EE Sala - या वर्षी
Cup Namde - कप आमचा आहे.

थोडक्यात EE Sala Cup Namde म्हणजे यावर्षी कप आमचा आहे, असा या घोषणेचा अर्थ आहे.

( नक्की वाचा : Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेनं वाढवलं टेन्शन! MCA ची मनधरणीसाठी धावाधाव )
 

आरसीबीची प्लेईंग 11 कशी असेल?

पहिल्या वाहिल्या आयपीएल विजेतेपदापासून आरसीबीची टीम फक्त 1 विजय दूर आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध फायनलमध्ये आरसीबीची प्लेईंग 11 कशी असेल याची सर्वांना उत्सुकता आहे. आयपीएल प्ले ऑफमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध  विजय मिळवलेली टीमच आरसीबी फायनलमध्येही कायम ठेवण्याची शक्यता दाट आहे.

Advertisement

RCB Playing 11 : विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कॅप्टन), मयांक अग्रवाल, लियाम लिव्हिंगस्टोन/टीम डेव्हिड, जितेश शर्मा (विकेट किपर), रोमारियो शेपर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवूड, सुयश शर्मा (इम्पॅक्ट सब)

Topics mentioned in this article