IPL 2025 : कोलकाता विरुद्ध लखनौ यांच्यातील सामन्यात बदल होणार, काय आहे कारण?

IPL 2025, LSG vs KKR Match : बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) चे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी मंगळवारी कोलकाता पोलिसांशी झालेल्या चर्चा केली. या चर्चेनंतर पोलिसांनी रामनवमीच्या दिवशी सामन्याला परवानगी दिली नसल्याची माहिती दिली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

क्रिकेटचा महासंग्राम आयपीएल 2025 ला काही दिवसातच सुरुवात होणार आहे. या हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे. आयपीएल 2025 सुरु होण्यापूर्वीच वेळापत्रकात बदल करावा लागण्याची शक्यता आहे. 

रामनवमीच्या उत्सवामुळे पोलिसांनी सुरक्षा मंजुरी न दिल्याने 6 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याची वेळ बदलली जाण्याची शक्यता आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे की रामनवमीला पश्चिम बंगालमध्ये 20 हजारहून अधिक मिरवणुका काढल्या जातील. ज्यामुळे राज्यभर सुरक्षा व्यवस्था वाढवली जाईल. बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) चे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी मंगळवारी कोलकाता पोलिसांशी झालेल्या चर्चा केली. या चर्चेनंतर पोलिसांनी रामनवमीच्या दिवशी सामन्याला परवानगी दिली नसल्याची माहिती दिली. 

(नक्की वाचा- IPL Most Sixes: ना रोहित ना कोहली, IPL मध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचे रेकॉर्ड कुणाच्या नावावर?)

स्नेहाशिष गांगुली यांनी सांगितले की, सामन्यासाठी पुरेशी सुरक्षा देऊ शकणार नाहीत, असं पोलिसांनी सांगितलं. जर पोलिस संरक्षण नसेल तर 65000 लोकांच्या गर्दीला सामावून घेणे अशक्य होते. आम्ही बीसीसीआयला कळवले आहे आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी अजूनही वेळ आहे. गेल्या वर्षीही रामनवमीला होणाऱ्या आयपीएल सामन्यात बदल करण्यात आला होता. 

Advertisement

(नक्की वाचा- Virat Kohli : T20I क्रिकेटमधील निवृत्ती मागं घेण्यास विराट तयार, टीमसमोर ठेवली खास अट)

आयपीएलचा भव्य उद्घाटन सोहळा 

आयपीएल 2025 च्या उद्घाटन सोहळ्यात प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या सादरीकरणाची शक्यता आहे. आयसीसी अध्यक्ष जय शाह आणि इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत ठोस अशी माहिती समोर आलेली नाही. 

Topics mentioned in this article