
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) या मॅचमध्ये मुंबईनं भन्नाट सुरुवात केली. वानखेडे स्टेडियमवरील या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय दिला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईच्या बॉलर्सनी हार्दिकचा निर्णय योग्य ठरवला. पहिल्या 6 ओव्हर्सच्या पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सनं केकेआरला चार मोठे धक्के दिले. ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर या अनुभवी बॉलर्सनं वानखेडेवर त्यांची जादू दाखवली. त्याचबरोबर त्यांना आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अश्विनी कुमार (Ashwani Kumar) या नवोदित खेळाडूनंही भक्कम साथ दिली.
मुंबई इंडियन्सकडून अश्विनीला या मॅचमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्यांनं सुरुवातीला अनुभवी क्विंटन डी कॉकचा भन्नाट कॅच घेतला. दीपक चहरच्या बॉलिंगवर अश्विनीनं हा कॅच पकडत मुंबईला महत्त्वाचं यश मिळवून दिलं.
( नक्की वाचा : IPL 2025 : स्पर्धा सुरु असतानाच 'ही' टीम कॅप्टन बदलणार! BCCI कडं परवानगीसाठी पोहोचला खेळाडू )
अश्विनी इथंच थांबला नाही. हार्दिकनं चौथ्या ओव्हरमध्ये अश्विनीकडं बॉल सोपवला. त्यानं पहिल्याच बॉलवर केकेआरचा कॅप्टन आणि अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला आऊट केलं. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पदार्पणाच्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेण्याचा जबरदस्त रेकॉर्ड अश्विनीनं केला आहे.
The feeling of your first #TATAIPL wicket 😊
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2025
Ashwani Kumar with a dream start as he picks up Ajinkya Rahane ✨
#MI could not have asked for a better start 👌#KKR 41/4 after 6 overs.
Updates ▶ https://t.co/iEwchzEpDk#MIvKKR pic.twitter.com/sPOTN5qpW2
कोण आहे Aswani Kumar?
अश्विनी कुमार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळणारा डावखुरा फास्ट बॉलर आहे आहे. सध्या 23 वर्षांचा असलेल्या अश्विनीला मुंबई इंडियन्सनं त्याच्या बेस प्राईजमध्ये 30 लाख रुपयांना खरेदी केलं. तो मागील सिझनमध्ये पंजाब किंग्जचा सदस्य होता. पण, त्याला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली नव्हती.
अश्विनीनं 2022 मधील सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पंजाबकडून पदार्पण केलं होतं. त्यामध्ये त्यानं 8.50 च्या इकोनॉमी रेट्सनं 3 विकेट्स घेतल्या. त्यानं पंजाबकडून 2 फर्स्ट क्लास आणि चार लिस्ट A सामने खेळले आहेत.
अश्विनीनं शेर-ए-पंजाब या T20 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तो या स्पर्धेत BLV ब्लास्टर्सकडून खेळला होता. या स्पर्धेत त्यानं डेथ ओव्हर्समध्ये दमदार बॉलिंग केली होती. 36 रन्स देत 4 विकेट्स ही त्याची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world