
IPL 2025, Kolkata Knight Riders vs Gujarat Titans : शुबमन गिलच्या गुजरात टायटन्सची आयपीएल 2025 मध्ये विजयी घौडदौड सुरु आहे. सोमवारी (21 एप्रिल 2025) झालेल्या सामन्यात गुजरातनं यजमान कोलकाता नाईट रायडर्सचा 39 रन्सनं पराभव केला. गुजरातचा या सिझनमधील हा सहावा विजय आहे. या विजयानंतर गुजरातचे 12 पॉईंट्स झाले आहेत. आता 'प्ले ऑफ' मधील जागा नक्की करण्यासाठी त्यांना आणखी दोन विजयाची गरज आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुजरातनं दिलेलं 199 रन्सचं आव्हान केकेआरला पेलवलं नाही. त्यांची सुरुवात खराब झाली. या सिझनमधील पहिलीच मॅच खेळणारा रहनउल्लाह गुरबाझ फक्त 1 रन काढून आऊट झाला. सुनील नरीनलाही मोठा स्कोअर करता आला नाही. तो 17 रन काढून परतला.
अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर जोडीला गुजरातच्या बॉलर्सनं चांगलंच जखडून ठेवलं होतं. अखेर साई सुदर्शननं अय्यरला 14 रनवर आऊट केलं. हे 14 रन करण्यासाठी त्याला 19 बॉल लागले. अजिंक्य रहाणेनं या सिझनमधील तिसरी हाफ सेंच्युरी झळकावली. पण, तो 50 रन पूर्ण होताच आऊट झाला.
आंद्रे रसेलकडून केकेआरला मोठी अपेक्षा होती. पण, तो 15 बॉलमध्ये 21 रन काढून आऊट झाला. आंद्रे रसेलकडून केकेआरला मोठी अपेक्षा होती. पण, तो 15 बॉलमध्ये 21 रन काढून आऊट झाला. प्रसिद्ध कृष्णानं एकाच ओव्हरमध्ये रमणदीप सिंह आणि मोईन अलीला आऊट करत केकेआरची अवस्था आणखी बिकट केली.
गुजरातची दमदार बॅटींग
टॉप ऑर्डरची दमदार बॅटिंग हे गुजरात टायटन्सच्या कामगिरीचं वैशिष्ट्य आहे. केकेआरविरुद्धही त्याची पुनरावृत्ती झाली. कॅप्टन शुबमन गिल (Shubman Gill) आणि साई सुदर्शननं (Sai Sudharsan ) पहिल्या विकेटसाठी 114 रनची भागिदारी केली.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात )
साई 52 रन काढून आऊट झाला. गिलची सेंच्युरी 10 रन्सनं हुकली. त्यानं 55 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 90 रन केले. जोस बटलरनंही त्याचा फॉर्म कायम राखत नाबाद 41 रन केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world