IPL 2025 Mega Auction Jos Buttler : 'जॉस द बॉस' ला मिळाली नवी टीम! बटलर कुणाकडून खेळणार? इथं वाचा

IPL 2025 Mega Auction LIVE Updates Jos Buttler : आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात विराट कोहलीनंतर सर्वाधिक सेंच्युरी झळकवण्याचा रेकॉर्ड जोस बटलरच्या नावावर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
2025 IPL Mega Auction Live Updates
मुंबई:

IPL 2025 Jos Buttler : इंग्लंडच्या T20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन जोस बटलर आगामी आयपीएल सिझनमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये बटलरला 15 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी करण्यात आलं. गेल्या काही महिन्यांमध्ये दुखापतीमुळे बटलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दूर होता.  पण, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड खणखणीत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसा आहे बटलरचा रेकॉर्ड?

T20 क्रिकेटमधील आक्रमक ओपनर आणि विकेटकिपर खेळाडूंच्या यादीत बटलरचं नाव आघाडीवर आहे. 2022 साली इंग्लंडनं जिंकलेल्या T20 वर्ल्ड कप टीमचा तो कॅप्टन होता. त्यानं आत्तापर्यंत 129 T20 इंटरनॅशनल मॅचमध्ये 147.02 च्या स्ट्राईक रेटनं 3389 रन केले आहेत. त्याचबरोबर 74 कॅच आणि 13 स्टंपिग करत विकेट किपर म्हणूनही अव्वल असल्याचं त्यानं सिद्ध केलंय. 

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासाहती बटलरची कामगिरी दमदार आहे. तो आयपीलमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू आहे. बटलरनं 2016 साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तो आत्तापर्यंत मुंबई इंडियन्ससह राजस्थान रॉयल्सकडूनही आयपीएलमध्ये खेळला आहे.

( नक्की वाचा : वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूची आयपीएल ऑक्शनमध्ये शेवटच्या क्षणी एन्ट्री, कोण करणार खरेदी? )
 


कोहलीनंतर बटलर

आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात विराट कोहलीनंतर सर्वाधिक सेंच्युरी झळकवण्याचा रेकॉर्ड बटलरच्या नावावर आहे. त्यानं आयपीएलमध्ये आजवर 7 सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्याचबरोबर 19 वेळा पन्नाशीचा टप्पा ओलांडलाय. बटलरनं आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 107 मॅचमध्ये 147.52 च्या स्ट्राईक रेटनं 3582 रन केले आहेत.

Advertisement

( नक्की वाचा :  IPL 2025 Mega Auction Arshdeep Singh : अर्शदीप सिंगला लागली बडी बोली, वाचा कुणी केलं खरेदी? )

बटलरसाठी आयपीएल 2022 चा सिझन चांगलाच यशस्वी ठरला होता. त्या सिझनमध्ये त्यानं एकाच सिझनमध्ये त्यानं 4 सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरीसह 863 रन काढले होते. तसंच तो सिझनमध्ये सर्वाधिक रन काढण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ऑरेंज कॅपचाही मानकरी ठरला होता.
 

Advertisement