जाहिरात

वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूची आयपीएल ऑक्शनमध्ये शेवटच्या क्षणी एन्ट्री, कोण करणार खरेदी?

IPL 2025 Mega Auction : आयपीएल मेगा ऑक्शनला काही दिवस शिल्लक असतानाच एका वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूची मेगा ऑक्शनमध्ये एन्ट्री झालीय.

वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूची आयपीएल ऑक्शनमध्ये शेवटच्या क्षणी एन्ट्री, कोण करणार खरेदी?
Jofra Archer
मुंबई:

मानसी पिंगळे, प्रतिनिधी

IPL 2025 Mega Auction : सध्या क्रिकेट विश्वात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) टेस्ट सीरिज इतकीच आयपीएल मेगा ऑक्शनची चर्चा आहे. येत्या 24 आणि 25 नोव्हेंबपला सौदी अरेबियामध्ये हे मेगा ऑक्शन होणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत आणि खडतर T20 लीगमध्ये खेळण्याची सर्वच देशातील खेळाडूंची इच्छा आहे. यावर्षी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी बीसीसीआयनं 574 खेळाडूंची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. त्यामध्ये 366 भारतीय आणि 208 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मेगा ऑक्शनला काही दिवस शिल्लक असतानाच एका वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूची मेगा ऑक्शनमध्ये एन्ट्री झालीय.

इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरही आगामी मेगा ऑक्शनमध्ये दाखल झालाय. आर्चर हा इंग्लंडचा प्रमुख फास्ट बॉलर आहे. इंग्लंडला आजवर एकमेव वन-डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात आर्चरचा महत्त्वाचा वाटा होता. तो यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन टीमकडून खेळला आहे.

 ('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सुरुवातीला नाकारली होती परवानगी


विदेशी खेळाडूंना आयपीएल खेळण्यासाठी त्यांच्या देशातील क्रिकेट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आवश्यक असते. आर्चरला दुखापतीचा मोठा इतिहास आहे. आगामी महत्त्वाच्या स्पर्धांचा इतिहास लक्षात घेता आर्चरला हे प्रमाणपत्र सुरुवातीला इंग्लंड क्रिकेट बोर्डानं दिलं नव्हतं. 

आयपीएलच्या आगामी सिझनसाठी बीसीसीआयनं खास नियम बनवले आहेत. त्या नियमानुसार एखादा खेळाडू जो आयपीएलमध्ये यापूर्वी खेळलाय. पण, त्यानं आगामी ऑक्शनमध्ये नाव नोंदवलं नसेल, तर त्याला पुढील काही वर्ष आयपीएलमध्ये खेळता येणार नाही.

IPL 2025 Auction : टीम इंडियासाठी 'करुन दाखवलं' राजस्थानमध्ये होणार? राहुल द्रविड कुणाला निवडणार?

( नक्की वाचा :  IPL 2025 Auction : टीम इंडियासाठी 'करुन दाखवलं' राजस्थानमध्ये होणार? राहुल द्रविड कुणाला निवडणार? )

या नियमामुळे आर्चर इंग्लंड क्रिकेट बोर्डावर नाखुश होता. त्याला आयपीएल 2025 मध्ये सहभागी होण्यास परवानगी मिळाली नाही तर आगामी काही ऑक्शनही त्याला खेळता येणार नव्हतं. त्यामुळे आर्चर आणि ईसीबीमध्ये झालेल्या चर्चेनंतर त्याला ना हरकत प्रमाणपत्र मिळालं आहे. 

कोणती टीम खरेदी करणार?

जोफ्रा आर्चर हा T20 फॉर्मेटमधील एक स्पेशालिस्ट बॉलर आहे.  त्याचबरोबर लोअर ऑर्डरमधील त्याची बॅटिंगही उपयुक्त आहे. त्यामुळे त्याला खरेदी करण्यासाठी टीममध्ये चढाओढ लागू शकते. राजस्थान रॉयल्सकडं 2018 ते 2021 या कालावधीत आर्चर होता. ती टीम यंदा पुन्हा एकदा आर्चरवर बोली लावू शकते. 

IPL 2025 : शाहरुखचा 'बाजीगर' कुणाचा होणार 'डॉन'?, आयपीएल विजेत्या कॅप्टनसाठी 3 टीममध्ये चुरस

( नक्की वाचा : IPL 2025 : शाहरुखचा 'बाजीगर' कुणाचा होणार 'डॉन'?, आयपीएल विजेत्या कॅप्टनसाठी 3 टीममध्ये चुरस )

जोफ्रा आर्चर हा अनुभवी खेळाडू आहे. चेन्नई सुपर किंग्जचं अनुभवी खेळाडूंना नेहमीच प्राधान्य असते. त्यामुळे सीएसके देखील आर्चरला खरेदी करण्यासाठी प्रयत्न करु शकते. राजस्थान आणि सीएसके प्रमाणेच पंजाब किंग्जही आर्चरला खरेदी करण्याच्या स्पर्धेत आहे.पंजाब किंग्जने आयपीएल 2025 साठी फक्त दोन खेळाडूंना रिटेन केले आहे. त्यामुळे यावेळी पंजाबला टीम नव्याने बांधावा लागणार आहे . या परिस्थितीत पंजाब किंग्ज जोफ्रा आर्चरवर मोठी बोली लावू शकते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com