IPL 2025 Mega Auction Live Updates : CSK चं मॅजिक त्रिकूट पुन्हा एकत्र, धमाका होणार!

IPL 2025 Mega Auction Live Updates : पाच वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी चेन्नई सुपर किंग्ज कुणाला खरेदी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. चेन्नईनं त्यांच्या जुन्या खेळाडूला पुन्हा खरेदी करत त्यांच्या फॅन्सला खुश केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

IPL 2025 Mega Auction Live Updates : आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन सौदी अरेबियात सुरु आहे. या मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बोलीचा विक्रम लागला. ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सनं 27 कोटींना खरेदी केलं. आयपीएल लिलावात विक्री झालेला पंत सर्वात महगडा खेळाडू होता. पाच वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी चेन्नई सुपर किंग्ज कुणाला खरेदी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. चेन्नईनं त्यांच्या जुन्या खेळाडूला पुन्हा खरेदी करत त्यांच्या फॅन्सला खुश केलं आहे.

चेन्नई सुपर किंग्जनं टीम इंडियाचा महान स्पिनर आर. अश्विनला खरेदी केलं आहे. सीएसकेनं अश्विनला 9 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केलं. तामिळनाडूकडूनच देशांतर्गत क्रिकेट खेळणारा अश्विन हा चेन्नईच्या कोअर टीमचा खेळाडू होता. तो 2008 ते 2015 या कालावधीमध्ये चेन्नईकडं होता. या काळात चेन्नईनं मिळवलेल्या विजेतेपदामध्ये अश्विनचा महत्त्वाचा वाटा होता.

आयपीएल 2016 च्या मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्जनं अश्विनला खरेदी केलं. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समार्गे अश्विन पुन्हा चेन्नईत परतलाय. ही चेन्नईच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे.

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2025 Mega Auction KL Rahul : केएल राहुल झाला दिल्लीकर, शेवटच्या क्षणी केली CSK वर मात )

चेन्नई सुपर किंग्जनं यापूर्वीच रविंद्र जाडेजाला रिटेन केलं आहे. त्यापाठोपाठ त्याचा टीम इंडियातील सहकारी आर. अश्विनला खरेदी केलंय. जडेजा आणि अश्विन यांच्या स्पिन बॉलिंगचा सर्वात चांगला वापर करणारा महेंद्रसिंह धोनीही चेन्नईकडे आहे. या त्रिकुटानं यापूर्वीही चेन्नईला संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. आता तब्बल 10 वर्षांनी पुढील आयपीएल सिझनमध्ये हे त्रिकूट चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे.

Advertisement


3 खेळाडूंची केली खरेदी

चेन्नई सुपर किंग्जनं अश्विनपूर्वी 3 खेळाडूंची खरेदी केली. त्यांनी सर्वात प्रथम डेव्हॉन कॉनवेला  6 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केलं. त्यानंतर राहुल त्रिपाठीला 3 कोटी 40 लाख रुपयांना घेतलं. राहुल पहिल्यांदाच सीएसकेकडून खेळणार आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंडचा ऑल राऊंडर राचिन रविंद्रलाही चेन्नईनं 4 कोटी रुपयांना RTM चा वापर करत खरेदी केलं.

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2025 Mega Auction, Yuzvendra Chahal : आयपीएलमधील सर्वात यशस्वी बॉलरची टीम ठरली )

चेन्नई सुपर किंग्जनं आत्तापर्यंत खरेदी केलेले खेळाडू

  1. ऋतुराज गायकवाड (कॅप्टन)
  2. मथीशा पथीराना
  3. शिवम दुबे
  4. रविंद्र जडेजा
  5. महेंद्रसिंह धोनी  (विकेटकिपर)
  6. डेव्हॉन कॉनवे
  7. राहुल त्रिपाठी
  8. राचिन रविंद्र
  9. आर. अश्विन