जाहिरात

IPL 2025 Mega Auction, Yuzvendra Chahal : आयपीएलमधील सर्वात यशस्वी बॉलरची टीम ठरली

IPL 2025 Mega Auction Live Updates : आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात यशस्वी बॉलर असलेल्या युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal)  टीम ठरली आहे

IPL 2025 Mega Auction, Yuzvendra Chahal  : आयपीएलमधील सर्वात यशस्वी बॉलरची टीम ठरली
मुंबई:


IPL 2025 Mega Auction Live Updates : आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात यशस्वी बॉलर असलेल्या युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal)  टीम ठरली आहे. चहलला या ऑक्शनमध्ये पंजाब किंग्जनं 18 कोटी रुपयांना खरेदी केलं. 

चहल, आजवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्सकडून आयपीलमध्ये खेळला आहे. त्यानं या दोन्ही टीमकडून दमदार कामगिरी केलीय. चहलनं आत्तापर्यंत 160 आयपीएल मॅचमध्ये 7.84 च्या इकोनॉमी रेटनं 205 विकेट्स घेतल्या आहेत. चहलनं एका मॅचमध्ये चार विकेट्स घेण्याची कामगिरी 6 वेळा तर पाच विकेट्स घेण्याची कामगिरी 1 वेळा केलीय. 

( नक्की वाचा : IPL 2025 Mega Auction Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा भाव घसरला, दिल्लीनं केलं खरेदी )

चहलची टीम इंडियाकडूनही T20 इंटरनॅशलमधील कामगिरी दमदार आहे. तो या प्रकारातील भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे. त्यानं टीम इंडियाकडून 80 मॅचमध्ये 96 विकेट्स घेतल्यात. त्यानंतरही तो ऑगस्ट 2023 नंतर एकही इंटरनॅशनल मॅच खेळलेला नाही. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सनंही त्याला आगामी सिझनसाठी रिटेन केलेलं नव्हतं.

( नक्की वाचा : IPL 2025 Mega Auction Arshdeep Singh : अर्शदीप सिंगला लागली बडी बोली, वाचा कुणी केलं खरेदी? )

T20 क्रिकेटमधील एक हुशार बॉलर म्हणून चहल ओळखला जातो. मिडल आणि डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी बॉलिंग करण्याची त्याची क्षमता आहे. एका सिझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप करण्याची कामगिरीही त्यानं केली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com