IPL 2025 Mega Auction, Rishabh Pant : ऋषभ पंतचा नवा रेकॉर्ड, LSG नं लावली सर्वात मोठी बोली

Rishabh Pan in Mega Auction : ऋषभ पंतने 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2016 ते 2024 असं सलग 8 वर्ष ऋषभ दिल्ली संघाचा भाग होता. दिल्लीकडून खेळताना त्याने चमकदार कारगिरी करत आयपीएलमध्ये आपली वेगली छाप सोडली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केल्यानंतर आता लखनौ सुपर जायंट्सनं  ऋषभ पंतवर विश्वास दाखवला आहे. ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सनं 27 कोटी रुपयांना खरेदी केलंय. आयपीएल लिलावात कोणत्याही खेळाडूला मिळालेली ही सर्वात जास्त किंमत आहे. 

मेगा ऑक्शन आधी एका मॉक ऑक्शनमध्ये ऋषभ पंतला सर्वाधिक किमतीत विकले गेला होता. पंजाब किंग्जने मॉक ऑक्शनमध्ये पंतवर बोली लावली आणि त्याला 33 कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण प्रत्यक्ष ऑक्शनमध्ये त्याला लखनौ सुपर जायंट्सनं खरेदी केलं आहे. 

ऋषभ पंतचं आयपीएल करिअर

ऋषभ पंतने 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2016 ते 2024 असं सलग 8 वर्ष ऋषभ दिल्ली संघाचा भाग होता. दिल्लीकडून खेळताना त्याने चमकदार कारगिरी करत आयपीएलमध्ये आपली वेगली छाप सोडली. 

ऋषभ पंतने आतापर्यंत 111 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 3284 धावा कुटल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 18 अर्धशतकं झळकली आहेत. पंतने 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारले.

Advertisement

( नक्की वाचा : IPL Mega Auction: श्रेयस अय्यरवर पैशांचा पाऊस! तब्बल 26.75 कोटींना पंजाबने केले खरेदी )
 

दरम्यान कार अपघातात गंभीर दुखापतीमुळे त्याला एका सीजनला मुकावे लागले होते. दुखापतीतून बरे झाल्यानंतर पंतने आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन केले होते. मात्र दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2025 पूर्वी पंतला रिलीज केले आहे. पंतला रिलीज केल्यानंतर तो 2025 च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल अशी शक्यता वर्तवली जात होती.

Topics mentioned in this article