IPL 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरला संघाने रिलीज केलं होतं. त्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये श्रेयस अय्यरवर पैशांचा अश्ररश: पाऊस पडला आहे. श्रेयस अय्यरला पंजाब किंग्स या संघाने तब्बल 26 कोटी 75 लाख रुपये खर्च करुन आपल्या संघात सामील करुन घेतले आहे.
माजी IPL विजेता कॅप्टन श्रेयस अय्यरसाठी KKR आणि पंजाबमध्ये बिडींग वॉर पाहायला मिळालं. 2 कोटींवरुन अय्यरच्या बोलीने 26 कोटी 75 लाखांपर्यंत मजल मारली. अखेरीस श्रेयस अय्यर पंजाब किंग्जच्या संघात दाखल झाला आहे. श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
मॉक ऑक्शनमध्येही श्रेयसची हवा
IPL 2025 च्या मेगा ऑक्शनच्या एक दिवस पार पडलेल्या मॉक ऑक्शनमध् श्रेयस अय्यर मोस्ट वॉन्टेड खेळाडू दिसला. श्रेयस अय्यरवर अनेक फ्रँचायझींनी विश्वास दाखवत खरेदीसाठी उत्सुकता दाखवली होती. मात्र कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयसला पुन्हा आपल्या संघात सामील करुन घेतले. केकेआरने 21 कोटी रुपये खर्च करून आपला जुना कर्णधार संघात सामील करुन घेतले होते.
(नक्की वाचा- IPL 2025 Mega Auction Arshdeep Singh : अर्शदीप सिंगला लागली बडी बोली, वाचा कुणी केलं खरेदी?)
श्रेयस अय्यरचं आयपीएल करिअर
श्रेयस अय्यरने त्याचे आयपीएल करिअर दिल्ली संघासोबत सुरु केले होते. दिल्लीशिवाय तो केकेआरकडूनही खेळला आहे. त्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 116 सामने खेळून आयपीएलमध्ये 3127 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 32.23 आहे आणि तो 127.47 च्या सरासरीने धावा करतो. श्रेयसने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही शतक झळकावलेले नाही, मात्र त्याने 21 अर्धशतके नक्कीच केली आहेत.
( नक्की वाचा : IND vs AUS : गंभीरच्या लाडक्या शिष्यानं केली 'डोकेदुखी' दूर, भन्नाट बॉलवर मिळाली मोठी विकेट, Video )
श्रेयस अय्यरचे आयपीएल महत्त्वाचे टप्पे
2015 च्या आयपीएल हंगामातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू होता. दिल्लीने त्याला 2015 च्या लिलावात 2.6 कोटी रुपये खर्च करुन खरेदी केले होते. 2015 मध्ये इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला होता. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणारा सर्वात तरुण कर्णधार देखील ठरला. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो फलंदाज आहे. आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या सुरुवातीलाच सामनावीराचा पुरस्कार जिंकून त्याने कमाल केली होती. श्रेयस चॅम्पियन कर्णधार देखील आहे. त्याने कोलकाताचं नेतृत्व करताा 2024 च्या आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.