IPL 2025 : विराट कोहली RCB च्या कॅप्टनवरच नाराज? मॅच दरम्यान कोचशी झालेली चर्चा Viral

Virat Kohli : या चर्चेच्या दरम्यान विराट नाराज दिसत आहे. विराट कोहली आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदारवर नाराज आहे, असा अंदाज ही चर्चा पाहून फॅन्स व्यक्त करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

IPL 2025, RCB vs DC : इंडियन प्रीमियर लीग 2025 मधील 24 वी लढत गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये झाली. बेंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर झालेल्या या मॅचमध्ये दिल्लीनं आरसीबीचा 6 विकेट्सनं पराभव केला. आरसीबीनं दिलेलं 164 रन्सचं आव्हान दिल्लीनं 17.5 ओव्हरमध्येच पूर्ण केलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अनुभवी खेळाडू केएस राहुलची आक्रमक खेळी हे दिल्लीच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. त्यानं 53 बॉलमध्ये नाबाद 93 रन काढले. या मॅचच्या दरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि आरसीबीचा बॅटिंग कोच तसंच मेंटॉर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik ) यांच्यातील चर्चेचा प्रसंग व्हायरल होत आहे. 

दिल्लीच्या इनिंगमधील 16 व्या ओव्हरच्या दरम्यान बाऊंड्रीवर उभा असलेल्या विराटची कार्तिकसोबत चर्चा झाली. या चर्चेच्या दरम्यान विराट नाराज दिसत आहे. विराट कोहली आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदारवर नाराज आहे, असा अंदाज ही चर्चा पाहून फॅन्स व्यक्त करत आहेत. आरसीबी कॅप्टननं मॅचच्या महत्त्वाच्या टप्प्यात नीट फिल्डिंग लावली नाही तसंच योग्य बॉलर्सकडं बॉल दिला नाही, म्हणून विराट नाराज असल्याची चर्चा फॅन्समध्ये आहे.

आरसीबीनं दिलेल्या 164 रनचा पाठलाग करत असताना दिल्लीची अवस्था पहिल्या 10 ओव्हर्समध्ये 4 आऊट 66 झाली होती. त्यावेळी दिल्लीला विकेट सांभळण्याबरोबरच रन रेट वाढवण्याची देखील गरज होती. केएल राहुलनं हे काम उत्तम पद्धतीनं केलं. जोश हेजलवूडनं टाकलेल्या 15 व्या ओव्हरमध्ये मॅचचं चित्रचं बदललं. त्या ओव्हरमध्ये राहुलनं 22 रन काढले. 

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2025, RCB vs DC : KL राहुलची 'कमाल लाजवाब' खेळी रंगतदार लढतील दिल्लीचा RCB वर विजय )

आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदारनं खराब बॅटिंगमुळे टीमचा पराभव झाला असल्याचं मत व्यक्त केलं. आरसीबीचा या सिझनमधील हा दुसरा पराभव आहे. या पराभवानंतर आरसीबी पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स ही या स्पर्धेतील आत्तापर्यंतची एकमेव अपराजित टीम आहे. दिल्लीनं सलग चार विजयासह पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article