IPL 2025, RCB vs GT : आयपीएल 2025 मध्ये बुधवारी (2 एप्रिल 2025) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स (Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans) यांच्यात मॅच झाली. या मॅचमध्ये गुजरातनं आरसीबीचा 8 विकेट्सनं सहज पराभव केला आरसीबीचा हा या सिझनमधील पहिलाच पराभव आहे. आरसीबीवरील विजयानंतर गुजरतचा कॅप्टन शुबमन गिलची (Shubaman Gill) सात शब्दांची पोस्ट व्हायरल झाली आहे. गिलनं या पोस्टमध्ये कुणाचं नाव घेतलं नसलं तरी ती पोस्ट विराट कोहलीला उद्देशून असल्याचं मानलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला गिल?
शुबमन गिलनं गुजरातच्या विजयानंतर एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. 'खेळावर लक्ष हवं, गोंधळावर नको' या अर्थाची पोस्ट गिलनं शेअर केली आहे. गिलची ही पोस्ट विराट कोहलीला उद्देशून असल्याचं मत फॅन्स व्यक्त करत आहेत. कारण, विराटनं गिल आऊट झाल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केलं होतं.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं या स्पर्धेची सुरुवात दमदार केली होती. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पहिल्या दोन मॅचमध्ये पराभव केला. त्यानंतर आरसीबीचा होम ग्राऊंडवरील पहिल्याच मॅचमध्ये पराभव झाला. गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये आरसीबीनं बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये निराशा केली.
( नक्की वाचा : IPL 2025 : सिराजचा चटका, 'बटलर'चं मख्खन, गुजरातनं शिजवली विजयाची खिचडी, RCB ला दुहेरी धक्का )
या मॅचनंतर बोलताना गिल म्हणाला की, 'या मैदानात प्रत्येकासाठी काही तरी होतं. आम्ही त्यांना 170 पर्यंत रोखत चांगली कामगिरी केली. तुम्ही इथं 250 रन्स देखील करु शकता. त्याचबरोबर लवकर विकेट देखील घेऊ शकत होता. हे मैदान पहिल्या 7-8 ओव्हर्समध्ये फास्ट बॉलर्सना मदत करणारं होतं.
आम्ही लवकर विकेट्स घेतल्या तर आमची मॅच आहे, हे आम्हाला माहिती आहे. कॅच सुटल्यानं निराश होणं स्वाभाविक आहे. पण, तुम्ही पुन्हा एकदा पुढील संधीची वाट पाहून तिथं कमबॅक करणं आवश्यक आहे. आम्ही पिचचा विचार करता व्यावसायिक पद्धतीनं बॅटिंग केली. आम्ही परिस्थितीला अनुसरुन खेळ केला, असं गिलनं स्पष्ट केलं.