आयपीएल 2025 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Royal Challengers Bengaluru vs Rajasthan Royals ) यांच्यात बुधवारी (24 एप्रिल) रोजी सामना झाला. या सामन्यात आरसीबीनं 11 रन्सनं विजय मिळवला.
206 रन्सचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं दमदार सुरुवात केली. यशस्वी जैस्वालनं फक्त 19 बॉलमध्ये 49 रन काढले. तर 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं 2 सिक्सच्या मदतीनं 16 रन काढले. राजस्थानचा कॅप्टन रियान परागनं चांगली सुरुवात केली. पण, तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. परागनं 10 बॉलमध्ये 22 रन केले.
राजस्थान रॉयल्सचा या सिझनमधील हा सलग पाचवा पराभव आहे. राजस्थाननं या सिझनमध्ये नऊपैकी 7 सामने गमावले असून त्यांचं स्पर्धेतील आव्हान आणखी धोक्यात आलंय. तर आरसीबीचा नऊ सामन्यातील हा सहावा विजय आहे. विशेष म्हणजे आरसीबीनं घरच्या मैदानावर या सिझनमध्ये पहिल्यांदाच सामना जिंकला आहे. या विजयासह आरसीबीनं या सिझनमधील घरच्या मैदानावर सुरु असलेली पराभवाची मालिका मोडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विराट कोहलीचा रेकॉर्ड
Iआरसीबीकडून विराट कोहलीनं (Virat Kohli) सर्वात जास्त 70 रन केले. विराटनं 42 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्स लगावले.
विराटनं फक्त 32 बॉलमध्ये या सिझनमधली पाचवी हाफ सेंच्युरी झळकावली. आयपीएल कारकिर्दीमधील ही त्याची 60 वी हाफ सेंच्युरी होती. राजस्थान रॉयल्स विरुद्ध विराटनं T20 क्रिकेटमध्ये आणखी एक ऐतिहासिक रेकॉर्ड केला.
( नक्की वाचा : PSL : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सुपर लीग धोक्यात, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं )
विराट आता टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त हाफ सेंच्युरी (Virat Kohli Record Most Fifty Plus score in T20) बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. विराटनं 112 वेळी 50 पेक्षा जास्त रन्स केले आहेत. आता फक्त ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर या यादीमध्ये विराटच्या पुढं आहे.
विराट कोहलीप्रमाणेच देवदत्त पडिक्कलनंही हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानं 50 रन काढले. टीम डेव्हिडनं 15 बॉलमध्ये नाबाद 23 तर जितेश शर्मानं 10 बॉलमध्ये नाबाद 20 रन केले.