जाहिरात

IPL Auction 2026 : CSK ला नमवून Cameron Green ला घेतलं, पण KKR फसली, जाणून घ्या का कापले जाणार ग्रीनचे पैसे?

IPL 2020 Auction Live Update : आयपीएल 2026 च्या आगामी मिनी लिलावात  ऑस्ट्रेलियाा ऑल राऊंडर कॅमेरुन ग्रीनला मोठी बोली लागली. पण त्याचे कोट्यावधींचं नुकसान होणार आहे.

IPL Auction 2026 :  CSK ला नमवून  Cameron Green ला घेतलं, पण KKR फसली, जाणून घ्या का कापले जाणार ग्रीनचे पैसे?
IPL 2026 Auction Cameron Green : बीसीसीआयच्या नियमामुळे केकेआर आणि ग्रीनचे नुकसान होणार आहे.
मुंबई:

IPL 2020 Auction Live Update : आयपीएल 2026 च्या आगामी मिनी लिलावात  ऑस्ट्रेलियाा ऑल राऊंडर कॅमेरुन ग्रीनला मोठी बोली लागली. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या टीमनं ग्रीन खरेदी करण्यासाठी जोरदार बोली लावली. या दोन्ही टीमकडं सर्वाधिक पैसे आहेत. पण, अखेर यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं बाजी मारली. केकेआरनं त्याला 25 कोटी 20 लाखांना खरेदी केलं.

कॅमेरुन ग्रीनला केकेआरनं 25 कोटी 20 लाखांना खरेदी केलं असलं तरी त्याला फक्त 18 कोटी रुपयेच मिळणार आहेत. ग्रीनचं 7.20 कोटींचं नुकसान होणार आहे. 

का होणार नुकसान?

केकेआरनं ग्रीनला 25 कोटी 20 लाख  रुपयांना खरेदी केले तरी त्याला प्रत्यक्षात 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही. आयपीएलच्या नियमांनुसार, कोणत्याही परदेशी खेळाडूला मिनी लिलावात 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन घेता येणार नाही. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी जी सर्वोच्च रिटेंशन रक्कम (18 कोटी) होती, तीच मर्यादा परदेशी खेळाडूंसाठी घालण्यात आली आहे.

( नक्की वाचा : IPL Auction 2026 Live: कोणत्या टीमनं खरेदी केला कोणता खेळाडू? वाचा लिलावातील सर्व अपडेट Live )

बीसीसीआयच्या नियमानुसार, मिनी लिलावात परदेशी खेळाडूची फी ही 18 कोटी रुपये किंवा मागील मेगा लिलावातील सर्वोच्च बोली, यापैकी जी रक्कम कमी असेल तितकीच निश्चित केली जाईल. त्यामुळे बोली कितीही मोठी लागली तरी ग्रीनला 18 कोटी रुपयांवरच समाधान मानावे लागेल.

या प्रक्रियेत केकेआरचं मात्र नुकसान होणार आहे.कारण केकेआरनं ग्रीनला 25 कोटी 20 लाखांची बोली लावून खरेदी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या पर्समधून पूर्ण 25 कोटी 20 लाख रुपये वजा केले जातील. मात्र, यातील 18 कोटी रुपये ग्रीनला मिळतील आणि उरलेले 7 कोटी 20 लाख रुपये बीसीसीआयकडे जमा होतील. ही रक्कम बोर्ड खेळाडूंच्या कल्याणासाठी वापरणार आहे.

सर्वात महागडा खेळाडू कोण?

सध्या ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना खरेदी करून इतिहास रचला होता.

कॅमेरून ग्रीनच्या आयपीएल प्रवासावर नजर टाकली तर, 2023 च्या मिनी लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला 17.05 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर 2024 मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे ट्रेड करण्यात आले. दुखापतीमुळे तो 2025 च्या हंगामात खेळू शकला नव्हता, पण आता तो पुन्हा केकेआरकडून मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com