IPL 2026 Auction Update : आयपीएल 2026 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) एका तरुण खेळाडूवर पैशांचा पाऊस पाडत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उत्तर प्रदेशच्या 20 वर्षीय प्रशांत वीर याला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी सीएसकेने तब्बल 14.20 कोटी रुपये खर्च केले आहेत. चेन्नईच्या या निर्णयामुळे या तरुण खेळाडूचे नशीब रातोरात पालटले असून त्याच्याकडे रवींद्र जडेजाचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे.
चेन्नई सुपर किंग्सला आगामी आयपीएल सिझनमध्ये रविंद्र जडेजासारख्या अष्टपैलू खेळाडूची गरज होती जो फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर संघाला सावरू शकेल. प्रशांत वीर हा डावखुरा स्पिनर असून तो स्फोटक बॅटिंगसाठी देखील ओळखला जातो. याच क्षमतेमुळे लिलावात त्याच्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली आणि सरतेशेवटी चेन्नईने बाजी मारली.
कोण आहे प्रशांत वीर ?
प्रशांत वीर हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. यूपी टी20 लीगमध्ये नोएडा सुपर किंग्सकडून खेळताना तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने आपली चमक दाखवली. या कामगिरीवर चेन्नईच्या स्काउट्सची बारीक नजर होती आणि त्यांनी या खेळाडूला ट्रायलसाठी देखील बोलावले होते.
(नक्की वाचा : IPL 2026 Auction : सरफराज खान अनसोल्ड! फिटनेस सुधारला, रन्सचा पाऊस पाडला, तरीही का डावललं? वाचा सविस्तर )
प्रशांत वीरच्या आकडेवारीवर नजर टाकली तर तो किती प्रभावी खेळाडू आहे हे समजते. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 7 सामन्यात 169.19 च्या स्ट्राइक रेटने रन केले आहेत. या स्पर्धेत त्याने 37.33 च्या सरासरीने 112 रन्स केले. यूपी टी20 लीगमध्ये देखील त्याने 10 सामन्यात 320 रन्स आणि 8 विकेट्स घेत ऑल राऊंड कामगिरीची चुणूक दाखवली होती. तिथे त्याचा स्ट्राइक रेट 155.34 इतका होता.
ऑक्शनमध्ये मिळाली मोठी रक्कम
आयपीएल ऑक्शनमध्ये प्रशांत वीर प्रशांत वीर अवघ्या 30 लाख रुपयांच्या बेस प्राईससह उतरला होता. मात्र त्याच्या अष्टपैलू गुणांमुळे त्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि तो 14.20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. या किंमतीसह प्रशांत वीर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. त्याने कार्तिक शर्माच्या 14.20 कोटी रुपयांच्या विक्रमाची बरोबरी केली असून आवेश खान आणि कृष्णप्पा गौतम यांसारख्या खेळाडूंना मागे टाकले आहे.
Entering the world of yellove and how?🥳🔥
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 16, 2025
Prashant Veer, the most expensive uncapped player in the IPL!📈📈#WhistlePodu #IPLAuction pic.twitter.com/OwJY0FhoZK
चेन्नई सुपर किंग्ससाठी प्रशांत वीर हा मीडल ओव्हर्समध्ये उपयुक्त ठरू शकतो. जडेजाच्या जागी एक दीर्घकालीन पर्याय म्हणून संघ व्यवस्थापन त्याच्याकडे पाहत आहे. डावखुरा स्पिनर असल्याने तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात आणि त्याच वेळी खालच्या क्रमांकावर येऊन मोठे फटके मारण्यात सक्षम आहे.
( नक्की वाचा : IPL Auction 2026 : CSK ला नमवून Cameron Green ला घेतलं, पण KKR फसली, जाणून घ्या का कापले जाणार ग्रीनचे पैसे? )
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे Uncapped खेळाडू
प्रशांत वीर: चेन्नई सुपर किंग्स- 14.20 कोटी रुपये - 2025
कार्तिक शर्मा- चेन्नई सुपर किंग्स- 14.20 कोटी रुपये, 2025
आवेश खान: लखनऊ सुपर जायंट्स - 10 कोटी रुपये - 2022
कृष्णप्पा गौतम: चेन्नई सुपर किंग्स - 9.25 कोटी रुपये - 2021
शाहरुख खान: पंजाब किंग्ज - 9 कोटी रुपये - 2022
राहुल तेवतिया: गुजरात टाइटन्स - 9 कोटी रुपये - 2022
क्रुणाल पांड्या: मुंबई इंडियंस - 8.8 कोटी रुपये - 2018
आकिब नबी: दिल्ली कैपिटल्स - 8.40 कोटी रुपये - 2025
वरुण चक्रवर्ती: किंग्स XI पंजाब - 8.40 कोटी रुपये - 2019
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world