IPL 2026 Auction : जडेजाला रिलीज केल्यानंतर CSK ची मोठी चाल; 'या' 5 तगड्या खेळाडूंना करणार लिलावात टार्गेट

IPL 2026 Auction Update, Chennai Super Kings : गेल्या सिझनमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये तळात राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी  मोठा फेरबदल केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
IPL 2026 Auction Update : या ऑक्शनमध्ये CSK च्या रडारवर हे 5 खेळाडू असतील.
मुंबई:

IPL 2026 Auction Update, Chennai Super Kings : गेल्या सिझनमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये तळात राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी  मोठा फेरबदल केला आहे. चेन्नईनं रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंना  रिलीज केले आहे, ज्यामुळे त्यांच्या पर्समध्ये तब्बल 43.40 कोटी रुपये शिल्लक आहेत. या मोठ्या रकमेसह, 'यलो आर्मी' आपल्या टीमला पुन्हा मजबूत करण्यासाठी आणि चॅम्पियनपदाच्या शर्यतीत परतण्यासाठी लिलावात काही 'गेम-चेंजिंग' प्लेयर्सवर लक्ष ठेवणार आहे. 

पाचवेळा स्पर्धा जिंकत आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम म्हणून ओळखली जाणारी चेन्नई सुपर किंग्स यंदा कोणत्या 5 प्रमुख खेळाडू खरेदी करण्यासाठी मोठी बोली लावू शकते ते पाहूया

लिविंगस्टोनवर असणार खास लक्ष

इंग्लंडचा पॉवर-हिटर ऑलराऊंडर लियाम लिविंगस्टोन हा CSK च्या निशाण्यावर असलेला महत्त्वाचा बॅटर आहे. यापूर्वी तो राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) साठी खेळला आहे. लिव्हिंगस्टोन सीएसकेसाठी मिडल ऑर्डर आणि फिनिशर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.  स्फोटक बॅटिंगसोबतच, तो उपयुक्त लेग स्पिनरही आहे. त्यामुळे सीएसकेच्या यादीत त्याचे नाव वरचे असेल.  

( नक्की वाचा : IPL 2026 Auction : तुमच्या आवडत्या टीमने कोणाला ठेवलं? पाहा रिलीज केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी, एका क्लिकवर )

व्यंकटेश अय्यरची CSK मध्ये एन्ट्री?

कोलकाता नाईट रायडर्सने रिलीज केलेला भारतीय ऑलराऊंडर वेंकटेश अय्यर हा देखील CSK साठी एक महत्त्वपूर्ण बॅटर ठरू शकतो. अय्यर ओपनिंग करू शकतो, गरज पडल्यास मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगची जबाबदारी घेऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्या बॉलिंगचा पर्यायही कॅप्टनकडे असेल.या ऑलराऊंड क्षमतेमुळेच तो  चेन्नईच्या टीमसाठी एक उपयुक्त खेळाडू आहे.

Advertisement

मथीशा पथिरानाचे पुनरागमन होईल? 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, CSK ने श्रीलंकेचा तेज गोलंदाज मथीशा पथिरानाला लिलावापूर्वी रिलीज केले आहे. मात्र, सूत्रांनुसार, त्याला पुन्हा आपल्या टीममध्ये घेण्यासाठी सीएसके जोरदार प्रयत्न करणार आहे.'बेबी मलिंगा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पथिरानाने CSK साठी आतापर्यंत 32 आयपीएल मॅचेस खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 47 विकेट्स घेतल्या आहेत. डेथ ओव्हर्समधील त्याची अचूक यॉर्कर्स टाकण्याची क्षमता CSK साठी खूप महत्त्वाची आहे.

( नक्की वाचा : IPL 2026 Trade : CSK नं सर जडेजाला सोडून संजू सॅमसनला का घेतलं? ही आहे खरी Inside Story )
 

कॅमरून ग्रीनवर सर्वांची नजर

ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर कॅमरन ग्रीनवर CSK सह अनेक टीम्सची नजर असेल, यात शंका नाही. तो आयपीएल 2026 च्या लिलावातील सर्वात जास्त मागणी असलेल्या खेळाडूंपैकी एक असू शकतो. ग्रीनने आतापर्यंत आयपीएलमध्ये  29 मॅचेसमध्ये 707 रन केले आहेत आणि 16 विकेट्सही घेतल्या आहेत. 

Advertisement

रवी बिश्नोईची गरज

रवींद्र जडेजाचा ट्रेड आणि आर. अश्विनच्या निवृत्तीनंतर, चेपॉकच्या फिरकीला मदत करणाऱ्या पिचसाठी एका चांगल्या विकेट घेणाऱ्या भारतीय स्पिनरची गरज CSK ला आहे. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने रिलीज केलेला भारतीय लेग-स्पिनर रवी बिश्नोई ही गरज पूर्ण करु शकतो. बिश्नोई 2025 सिझन थोडा महागडा ठरला असला तरी, त्यानं आजवर 77*मॅचेसमध्ये *72* विकेट्स आहेत. त्याची आक्रमक, वेगवान लेग-स्पिनची शैली चेपॉकच्या फिरकी ट्रॅकवर प्रभावी ठरू शकते. CSK त्याला नूर अहमदसोबत पार्टनर म्हणून पाहून बिश्नोई हा चांगला जोडीदार ठरेल.