Why CSK Traded Ravindra Jadeja & Bought Sanju Samson: चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सर्वात चर्चेत असलेल्या डीलवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. सीएसकेनं त्यांच्या टीममधील दोन महत्त्वाचे खेळाडू रविंद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थान रॉयल्सकडे संजू सॅमसनच्या बदल्यात ट्रेड केले आहे.
यामधील रविंद्र जडेजाला सोडण्याच्या सीएसकेच्या निर्णयानं क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसलाय. जडेजा तब्बल 11 सिझन सीएसकेचा प्रमुख खेळाडू आहे. टीमच्या अनेक संस्मरणीय विजयाच त्याचा सिंहाचा वाटा आहे. अगदी आयपीएल 2023 च्या फायनलमध्येही जडेजाच्या अविश्वसीन फटकेबाजीमुळेच सीएसकेला पाचव्यांदा विजेतेपद पटकावता आले. जडेजा पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स या त्याच्या जुन्या फ्रँचायझीकडं परतला आहे. या मोठ्या बदलामागे काय कारण आहे? हे सीएकेचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथ यांनी एका व्हिडिओ मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
काय आहे कारण?
काशी विश्वनाथन यांनी या ट्रेडबद्दल बोलताना सांगितले की, 'हा निर्णय भावनिकदृष्ट्या खूप वेदनादायक आहे. फॅन्सचे मला अनेक संदेश मिळाले आहेत, त्यांना खूप वाईट वाटले आहे, याची मला कल्पना आहे. मात्र, संघाची सध्याची संरचना पाहता आणि भविष्याचा विचार करता, सीएसकेच्या थिंक टँकला काही मोठे बदल करणे आवश्यक वाटले.
टीम मॅनेजमेंटला पूर्ण विश्वास आहे की, या निर्णयामुळे भविष्यातही सीएसके आपले दमदार आणि स्थिर प्रदर्शन कायम ठेवेल.' हा ट्रेड परस्पर संमतीनं झाला असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : IPL Retention : 10 'महागड्या' खेळाडूंना फ्रँचायझी दाखवणार बाहेरचा रस्ता? MI, KKR, DC मधील मोठे खेळाडू आऊट )
संजू सॅमसनला का घेतले?
काशी विश्वनाथ यांनी संजू सॅमसन याला संघात घेण्याचे नेमके कारण सांगितले. त्यांनी म्हटले की, फ्रँचायझी म्हणून आम्ही ट्रेडचा मार्ग फार कमी वेळा निवडला आहे; यापूर्वी फक्त रॉबिन उथप्पा याला संघात घेतले होते.
टीम मॅनेजमेंटला सध्या टॉप ऑर्डरच्या एका भारतीय बॅटरची कमतरता जाणवत होती. या वर्षीच्या मिनी ऑक्शनमध्ये चांगले भारतीय बॅटर जास्त प्रमाणात उपलब्ध नसतील. त्यामुळे भारतीय टॉप ऑर्डर बॅटरला संघात आणण्याचा ट्रेड विंडो हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असे टीम मॅनेजमेंटला वाटले.
From God's Own Country to Lion's Own Den! 💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2025
സ്വാഗതം, സഞ്ജു! #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/PHgbaMLk3B
जडेजाला संघातून सोडण्याचा निर्णय अतिशय कठीण होता, कारण त्यानं सीएसकेच्या यशात अनेक वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा सीएसकेच्या इतिहासातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
काशी विश्वनाथ यावेळी म्हणाले की, कोणताही मोठा निर्णय खेळाडूंच्या सल्ल्यानेच घेतला जावा लागतो आणि हा ट्रेड परस्पर संमतीने झाला आहे. जडेजासोबत चर्चा झाली, तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की व्हाईट-बॉल कारकीर्दीच्या अखेरीस त्याला थोडा ब्रेक हवा आहे. तसेच, सीएसकेसाठी पुढील काही वर्षांसाठी नवीन टीम तयार करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण सध्याचे काही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहेत. जडेजासारख्या ऑलराऊंडरला रिप्लेस करणे अवघड असले तरी, आम्ही काही उत्कृष्ट तरुण खेळाडू घेऊन ही कमतरता भरून काढू, अशी आशा आहे.
200 Matches
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2025
2354 Runs
152 wickets
94 catches
When history speaks of courage in Yellove,
it will echo your name. 💛⚔️
Thank You, Ravindra Jadeja! 🫡#WhistlePodu #ThalapathyForever pic.twitter.com/WNMlgSOIgD
सॅम करनला का सोडले?
जडेजासोबत सॅम करनलाही सीएसकेनं राजस्थानला ट्रेड केले आहे. तो 2020, 2021 आणि 2025 या सिझनमध्ये सीएसकेकडून खेळला आहे. जडेजा आणि सॅम करन या दोघांनाही सोडणे अतिशय कठीण होते, असे काशी विश्वनाथ यांनी सांगितले.
Won't forget your roars with the bat, ball & everything you gave for the pride.
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2025
Thank you, Super Sam! 💛#WhistlePodu pic.twitter.com/YJexpuopyP
संजू सॅमसनला विकत घेण्याचे खरे कारण
संजू सॅमसनला संघात घेण्याचे नेमके कारण सांगताना काशी विश्वनाथन म्हणाले की, संजू हा आयपीएलमधील सर्वात अनुभवी बॅटरपैकी एक आहे. त्याने आयपीएलमध्ये 4,500 पेक्षा जास्त रन केले आहेत. तसंच राजस्थान रॉयल्सचं नेतृत्त्वही केलं आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, संजू फक्त 30 वर्षांचा आहे. यामुळे, तो सीएसकेच्या भविष्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय असेल, असा विश्वास टीम मॅनेजमेंटला वाटतो.
इथे पाहा संपूर्ण व्हिडिओ
“Decision taken on mutual agreement with Jadeja and Curran.” - CSK MD Kasi Viswanathan speaks on the trade. #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/8HAZrdIBJP
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world