IPL 2026: "जोकर, मूर्ख, अहंकारी...", ललित मोदीचा संजीव गोयंकांवर निशाणा; बंदी घालण्याची केली मागणी, कारण....

IPL 2026: आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर संघ मालक संजीव गोयंका आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यातील कथित वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आयपीएल  2026 च्या हंगामात खेळाच्या मैदानाबाहेरील एका वादाने क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यातील एका संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदी यांनी गोयंका यांच्यावर शब्दांचा प्रहार केला आहे. "मी जर आजही पदावर असतो, तर गोयंकांवर तात्काळ बंदी घातली असती," अशा शब्दांत ललित मोदींनी आपला संताप व्यक्त केला आहे.

काय आहे नेमका वाद?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पराभवानंतर मैदानावरच संजीव गोयंका आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी चर्चा झाली. कॅमेरा अँगलमुळे हा संवाद अत्यंत तीव्र आणि रागाचा असल्याचे भासले. यापूर्वी केएल राहुलसोबतही गोयंकांचे असेच वागणे समोर आले होते, त्यामुळे चाहत्यांनी गोयंकांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले.

Advertisement

मायकल वॉनची प्रतिक्रिया 

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही यावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, "हंगामाचा हा फक्त पहिलाच सामना आहे, अशा वर्तणुकीची अजिबात गरज नव्हती."

(नक्की वाचा-  Pimpri-Chinchwad: सावधान! वाकडमध्ये प्रवास करताना होऊ शकते फसवणूक; पाहा VIDEO, नेमकं काय होतंय?

ललित मोदींचे खळबळजनक ट्विट

टॅक्स चोरी, मनी लॉन्ड्रिंग आणि आयपीएलमधील घोटाळ्याचे आरोप असलेले परदेशात स्थायिक असलेल्या ललित मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर गोयंकांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी लिहिले की,"संजीव गोयंका एक नंबरचा हरलेला आणि सर्वात मोठा 'जोकर' माणूस आहे. खेळाडू आणि चाहत्यांसाठी मी आयपीएल बनवले होते, अशा घटना पाहण्यासाठी नाही. जर मी आजही चेअरमन असतो, तर मी संजीव गोयंकांना तात्काळ बॅन केले असते आणि त्यांच्याकडून संघाची मालकी देखील काढून घेतली असती. गोयंका अत्यंत अहंकारी आणि मूर्ख माणूस आहे. फ्रँचायझी करारात यासाठी एक खास नियम आहे, बीसीसीआयने तो लागू करावा."

(नक्की वाचा-  Ajanta Caves: अजिंठा लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांमध्ये दहशत; अनेक पर्यटक अर्ध्यावरून माघारी

लखनऊ सुपर जायंट्सचे स्पष्टीकरण

वाढता वाद पाहून लखनऊ फ्रँचायझीने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. त्यांनी वेगळ्या कोनातून एक व्हिडिओ शेअर करत स्पष्ट केले की, सोशल मीडियावर जे दिसतेय ती पूर्ण सत्यता नाही. "मैदानावरील वातावरण इतके नकारात्मक नव्हते आणि संजीव गोयंका यांनी ऋषभ पंतला पाठिंबाच दिला आहे," असा दावा टीम मॅनेजमेंटने केला आहे.

Topics mentioned in this article