IPL 2026 LSG vs PBKS: आयपीएल 2026 मधील पंजाब किंग्स (PBKS) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यातील सामन्यात पंजाबने शानदार विजय मिळवला असला, तरी या सामन्यादरम्यान मैदानात एक अत्यंत लाजीरवाणी घटना घडली आहे. लखनौच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर सामन्यादरम्यान काही चाहत्यांनी चीअरलीडर्सशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. या गोंधळानंतर पोलिसांनी स्टेडियममध्येच हुल्लडबाजांना चांगलाच दम भरला.
नेमका काय घडला प्रकार?
शनिवारी रात्री झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सच्या विजयाचे सेलिब्रेशन सुरू असताना, प्रेक्षक गॅलरीतील काही अतिउत्साही आणि मद्यधुंद चाहत्यांनी तिथे उपस्थित असलेल्या महिला चीअरलीडर्ससोबत अश्लील कृत्य आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.
VIDEO
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडिओंनुसार, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून उत्तर प्रदेश पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या प्रेक्षक गॅलरीत धाव घेतली. पोलिसांनी गैरवर्तन करणाऱ्या चाहत्यांच्या गटाला जागीच पकडले आणि त्यांना चांगलाच धडा शिकवला. यावेळी एक महिला पोलीस कर्मचारी देखील संबंधित टवाळखोरांना कडक भाषेत समज देताना आणि कारवाई करताना दिसून आली. प्रेक्षकांकडून झालेल्या गैरवर्तनातर चिअरलिडर्स देखील काहीशा नाराज झालेल्या दिसल्या. टवाळखोरांच्या दिशेने पाहून चिअरलिडर्सनी देखील नाराजी व्यक्त करत काहीतरी सुनावल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. (नक्की वाचा- Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... ) दुसरीकडे, मैदानातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. या लाजिरवाण्या पराभवानंतर आणि लखनौचा या हंगामातील तब्बल 10 वा पराभव झाल्यानंतर कर्णधार रिषभ पंत कमालीचा निराश दिसला. सामन्यानंतर बोलताना रिषभ पंतने मान्य केले की, "त्याच्या संघासाठी आयपीएल 2026 चा हा हंगाम अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण राहिला. या संपूर्ण हंगामातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले असून आमच्यासाठी हा नक्कीच एक कठीण टप्पा होता."चिअरलिडर्सनाही राग अनावर
सातव्या पराभवानंतर भावूक झाला रिषभ पंत