IPL 2026: प्लेऑफचा थरार! 3 टीम, 1 जागा; चौथ्या स्थानासाठी चुरस; जाणून घ्या कसं असेल समीकरण?

IPL 2026 Playoff Scenarios: आयपीएल 2026 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा आणि शेवटचा संघ कोणता, याचा फैसला आज रविवारी होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

IPL 2026 Playoff Scenarios: आयपीएल 2026 चा लीग टप्पा आता अत्यंत रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. प्लेऑफमधील पहिल्या तीन जागा आधीच निश्चित झाल्या असताना, चौथ्या आणि अंतिम जागेसाठीचा थरार आज रविवारी रंगणार आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने (PBKS) लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) धुव्वा उडवत शर्यत अधिक रंजक केली आहे. पंजाबच्या या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सचे (DC) आव्हान संपुष्टात आले आहे.

कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर पंजाब किंग्सने लखनौने दिलेले 197 धावांचे आव्हान अवघ्या 18 षटकांत पूर्ण केले. या विजयासह पंजाबचे 14 सामन्यांत 15 गुण झाले असून ते सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. तर लखनौचा संघ 8 गुणांसह सर्वात शेवटी आहे. आता प्लेऑफच्या शर्यतीत पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे तीन संघ आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा-  Dombivli News: संतापजनक! हायप्रोफाईल सोसायटीत वृद्ध सुरक्षारक्षकाला मुजोर रहिवाशाकडून मारहाण, कारण... )

आजचे गणित कसे आहे?

पंजाब किंग्स (PBKS) -  15 गुण (NRR +0.309)

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे सर्व साखळी सामने संपले आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला आता नशिबाची साथ हवी आहे. आज दुपारी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) राजस्थान रॉयल्सचा (RR) पराभव केला पाहिजे. तसेच, दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) हरवले पाहिजे. जर केकेआर जिंकला, तर तो विजय अगदी लहान फरकाने असावा, जेणेकरून केकेआरचा नेट रन-रेट पंजाबपेक्षा पुढे जाणार नाही.

राजस्थान रॉयल्स (RR) - 14 गुण (NRR +0.083)

रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्ससाठी प्लेऑफचे समीकरण अगदी सरळ आणि सोपे आहे. राजस्थानला रविवारी दुपारी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. मुंबईवर विजय मिळवताच राजस्थान थेट 16 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरेल. जर आजचा सामना पावसामुळे धुवून निघाला, तर राजस्थानला 1 गुण मिळेल. मात्र, त्यांचा नेट रन-रेट पंजाबपेक्षा कमी असल्यामुळे राजस्थान शर्यतीतून बाहेर पडेल.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

कोलकाता नाईट रायडर्स - 13 गुण (NRR +0.011)

केकेआरचा शेवटचा सामना आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (DC) होणार आहे. मात्र, त्यांचे भवितव्य स्वतःच्या विजयासोबतच राजस्थानच्या पराभवावर अवलंबून आहे. केकेआरला पहिल्यांदा अशी प्रार्थना करावी लागेल की राजस्थान रॉयल्स आपला सामना मुंबई इंडियन्सकडून हरावा. त्यानंतर, केकेआरला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना अत्यंत मोठ्या फरकाने जिंकावा लागेल, जेणेकरून त्यांचा नेट रन-रेट पंजाब किंग्सच्या (+0.309) पुढे जाईल. आजच्या दोन महामुकाबल्यानंतर आयपीएल 2026 च्या प्लेऑफमधील चौथी पात्र टीम कोणती असेल, याचे चित्र स्पष्ट होईल.
 

Topics mentioned in this article