IPL 2026 Retention Deadline: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व फ्रँचायझींसाठी 15 नोव्हेंबर ही Retention (राखीव ठेवणे) आणि Released (सोडलेले) खेळाडूंची यादी अंतिम करण्याची डेडलाईन आहे. डिसेंबरमध्ये मिनी ऑक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक टीम सध्या त्यांच्या रणनीतीवर पुन्हा विचार करत आहेत. टीम खेळाडूंचे मूल्य, मैदानावरील कामगिरी आणि दुखापतींचे रेकॉर्ड या सर्व गोष्टींचा ताळमेळ घालून त्यांच्या पर्स (Pers) अर्थात लिलावासाठी उपलब्ध असलेल्या रकमेचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हा 'मेगा ऑक्शन' नसल्यामुळे, फ्रँचायझींना त्यांच्या इच्छेनुसार कितीही खेळाडूंना रिटेन्शन किंवा रिलीज करण्याचे स्वातंत्र्य आहे. संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात, ज्यात 8 परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. संघाची एकूण पगार मर्यादा (Salary Cap) 120 कोटी रुपये कायम राहणार आहे. अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी करणारे आणि मोठे मानधन (Price Tag) असलेले काही प्रमुख खेळाडू Release होण्याची शक्यता आहे.
कोणत्या प्रमुख खेळाडू या ऑक्शनपूर्वी रिलीज होण्याची शक्यता आहे ते पाहूया
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) - दीपक चहर (Deepak Chahar)
पाच वेळा IPL चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सने (MI) 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये वेगवान भारतीय पेसर दीपक चहर याला 9.25 कोटी रुपये खर्च करून संघात घेतले होते. मात्र, त्याची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही. मागील सिझनमधील 14 सामन्यांमध्ये त्याने केवळ 11 विकेट्स घेतल्या, ज्यात त्याचा ॲव्हरेज 34.18 आणि इकॉनॉमी रेट 9.17 होता. त्याचे वारंवार दुखापतग्रस्त होणे, ही देखील एक मोठी काळजीची गोष्ट आहे. त्यामुळे, मुंबई इंडियन्स त्याला रिलीज करून पर्समध्ये जागा मोकळी करू शकतो किंवा कमी किमतीत पुन्हा विकत घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : IPL 2026 Trade News : आला रे..... आयपीएल ऑक्शनपूर्वी बड्या खेळाडूची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री )
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) - मिचेल स्टार्क (Mitchell Starc)
दिल्ली कॅपिटल्सने (DC) अनुभवी ऑस्ट्रेलियन पेसर मिचेल स्टार्क याला 11.75 कोटी रुपये देऊन विकत घेतले होते. सुरुवातीला हा निर्णय चांगला वाटत होता, कारण स्टार्कने पहिल्या 2 सामन्यांत 8 विकेट्स घेतल्या. मात्र, पुढील 9 सामन्यांमध्ये तो केवळ 6 विकेट्स घेऊ शकला आणि त्यापैकी 4 सामन्यांत त्याला एकही विकेट मिळाली नाही. स्टार्कने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. IPL 2025 नंतर त्याने कोणताही टी-20 सामना खेळलेला नाही. त्यामुळे, दिल्ली कॅपिटल्स त्याला रिलीज करून भविष्यासाठी अधिक चांगल्या आणि दीर्घकाळ खेळू शकणाऱ्या बॉलरवर गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) - व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)
2024 मध्ये IPL टायटल जिंकल्यानंतर KKR ने व्यंकटेश अय्यर याला रिलीज केले होते, पण 2025 च्या ऑक्शनमध्ये त्याला पुन्हा टीममध्ये घेण्यासाठी तब्बल 23.75 कोटी रुपये खर्च केले. मात्र, या ऑलराऊंडरने त्याच्या प्राईस टॅगनुसार कामगिरी केली नाही. KKR ही मोठी रक्कम वापरून त्यांच्या टीममधील त्रुटी दूर करण्याचा विचार करत आहे, त्यामुळे अय्यरला रिलीज केले जाऊ शकते.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) - मोहम्मद शमी (Mohd Shami)
सनरायझर्स हैदराबादने (SRH) दिग्गज पेसर मोहम्मद शमी याच्यासाठी मोठी बोली लावली आणि 10 कोटी रुपये देऊन त्याला विकत घेतले. मागील ऑक्शनमध्ये तो SRH चा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यांनी भुवनेश्वर कुमारला रिलीज करून शमीच्या रूपात एका प्रभावी सीमिंग (Seaming) पर्यायावर विश्वास ठेवला, पण हा निर्णय फसला. मागील सिझनमध्ये शमीने केवळ 9 सामने खेळले, ज्यात त्याने 56.17 च्या ॲव्हरेजने 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे, SRH ही मोठी रक्कम पुन्हा ऑक्शनमध्ये दुसऱ्या खेळाडूंसाठी वापरण्याची शक्यता आहे.
पंजाब किंग्स (Punjab Kings) - ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलचा पंजाब किंग्समधील हा तिसरा कार्यकाळही फारसा यशस्वी झाला नाही. मागील सिझनमध्ये तो त्याच्या आक्रमक शैलीत दिसला नाही. दुखापतीमुळे बाहेर पडण्यापूर्वी त्याने 7 सामन्यांत केवळ 48 रन केले, ज्यात त्याचा ॲव्हरेज फक्त 8 होता. आता 37 वर्षांचा असलेला मॅक्सवेल आगामी ऑक्शनमध्ये गेला तर, त्याला त्याच्या नावाप्रमाणेच चांगली कामगिरी करावी लागेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (Royal Challengers Bengaluru) - लियाम लिव्हिंग्स्टोन (Liam Livingstone)
मागील सिझनचे चॅम्पियन असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) त्यांची बहुतांश टीम कायम ठेवण्याची शक्यता आहे. मात्र, इंग्लिश ऑलराऊंडर लियाम लिव्हिंग्स्टोनला रिलीज केले जाऊ शकते. तो अपेक्षेनुसार कामगिरी करु शकला नव्हता. त्याने 10 सामन्यांमध्ये त्याने केवळ 112 रन केले, ज्यात त्याचा ॲव्हरेज 16 होता. तो बॉलिंगमध्येही RCB साठी प्रभावी ठरला नाही.
लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) - मयंक यादव (Mayank Yadav)
LSG व्यवस्थापनाचा युवा पेसर मयंक यादववरचा विश्वास कमी होताना दिसत आहे. 11 कोटी रुपये देऊन रिटेन्शन लिस्टमध्ये कोर (Core) खेळाडू म्हणून ठेवलेल्या मयंकची IPL 2025 मधील मोहीम दुखापतीने खराब केली. तो फक्त 2 सामन्यांमध्येच खेळू शकला. LSG ही मोठी रक्कम पर्समध्ये घेऊन मिनी ऑक्शनमध्ये अधिक उपयुक्त खेळाडू विकत घेण्याचा विचार करू शकतो.
( नक्की वाचा : IPL 2026 Trade News : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स सोडणार? 'या' टीमसोबत व्यवहार, कारणही उघड )
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) - राहुल तेवतिया (Rahul Tewatia)
गुजरात टायटन्स (GT) कडे संतुलित संघ असला तरी, ते संघात नेहमीच सुधारणा करण्यासाठी जागा शोधत असतात. राहुल तेवतियाला टीम रिलीज करू शकते, कारण मागील सिझनमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. तेवातियानं मागील 2 सिझनमध्ये एकही ओव्हर टाकली नाही. गुजरात टायटन्स त्याला दिलेली 4 कोटी रुपये इतकी रक्कम इतर खेळाडूंसाठी वापरू शकतात.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) - महीश तीक्षणा (Maheesh Theekshana)
राजस्थान रॉयल्सकडं वनिंदू हसरंगा हा प्रमुख स्पिनर आहे. तसंच पुढच्या सिझनमध्ये रवींद्र जडेजा देखील संघात येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महीश तीक्षणा याला संघातून बाहेर पडावे लागू शकते. त्याची मागील सिझनमधील कामगिरी ठीकठाक होती. त्याने 11 सामन्यांमध्ये 9.76 च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या होत्या, पण हसरंगा आणि जडेजा सारखे मोठे पर्याय उपलब्ध असल्यामुळे तीक्षणाला रिलीज करावे लागू शकते.
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) - डेव्हॉन कॉनवे (Devon Conway)
CSK ला IPL विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अवघ्या 2 सिझनमध्येच डेव्हॉन कॉनवेला संघातून बाहेर जावे लागण्याची शक्यता आहे. CSK ने IPL 2025 मध्ये वेगवेगळ्या ओपनिंग कॉम्बिनेशन्सचा (Opening Combinations) प्रयोग केला, पण कॉनवेला बहुतेक वेळा बेंचवरच बसावे लागले. 6.25 कोटी रुपयेमध्ये विकत घेतलेल्या कॉनवेला रिलीज केले जाण्याची शक्यता आहे, कारण CSK संजू सॅमसनला टीममध्ये घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. कॉनवेनं मागील सिझनमध्ये 6 इनिंग्जमध्ये 131.09 च्या स्ट्राईक रेटने 156 रन केले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world