IPL 2026 Trade News : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 साठी खेळाडू रिटेन (Retain) करण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व फ्रँचायझींना (Franchises) रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंची अंतिम यादी तयार करण्यात व्यस्त आहेत. एका बाजूला चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि सॅम करन (Sam Curran) यांचा राजस्थान रॉयल्स (RR) च्या संजू सॅमसनसोबत (Sanju Samson) कथित ट्रेड (Trade) चर्चेत असतानाच, आता मुंबई इंडियन्स (MI) च्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.
काय आहे अपडेट?
ताज्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सचा (MI) युवा अष्टपैलू बॅटर आणि फास्ट बॉलर अर्जुन तेंडुलकर हा संघ सोडण्याची शक्यता आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) या दोन खेळाडूंसाठी म्हणजेच अर्जुन तेंडुलकर आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्या ट्रेडबद्दल चर्चा करत आहेत.
( नक्की वाचा : IPL Trade News : मुंबई इंडियन्सचं सिक्रेट डील ! बड्या खेळाडूला टीममध्ये घेतलं? रोहित शर्माचा आहे खास मित्र )
कशी होणार डील?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा ट्रेड खेळाडूंची थेट अदलाबदल (Swap Deal) नसेल. दोन्ही खेळाडूंसाठी हे स्वतंत्र व्यवहार (Individual Deals) असतील, ज्याला 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' (All-Cash Transfer Deal) असे म्हटले जात आहे. याचा अर्थ असा की, हे खेळाडू आपल्या मूळ फ्रँचायझीमधून बाहेर पडणार आणि ज्या नव्या संघात जाणार, तो संघ त्या खेळाडूसाठी रोख रक्कम (Cash) देणार. हा व्यवहार दोन स्वतंत्र रोख व्यवहारांच्या स्वरूपात होण्याची शक्यता आहे. या डीलची अधिकृत घोषणा BCCI कडून 15 नोव्हेंबर रोजी रिटेन्शन लिस्ट जाहीर झाल्यावर होण्याची अपेक्षा आहे.
अर्जुन तेंडुलकरची IPL कारकीर्द
अर्जुन तेंडुलकर 2023 मध्ये IPL मध्ये पदार्पण केले. त्याने मुंबई इंडियन्सकडून एकूण पाच सामने खेळले आहेत. ज्यात त्याने फक्त तीन विकेट्स घेतल्या आहेत. IPL २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला त्याच्या 30 लाख रुपये या मूळ किमतीत (Base Price) परत विकत घेतले होते. परंतु, त्याला म्हणावी तशी संधी मिळत नसल्याने तो आता नवीन टीममध्ये जाण्यास उत्सुक मानले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world