IPL 2026 रात्रीतून करोडपती होणाऱ्या आयपीएल स्टार्सना फ्रेंचायजी कशा प्रकारे पेमेंट करतात? वाचा सविस्तर माहिती

IPL 2026 Salary Secrets: . फ्रेंचायजी खेळाडूंना नेमका कशा प्रकारे पैसा देतात आणि त्यातील अटी काय असतात, याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

IPL 2026 Salary Secrets: आयपीएल ऑक्शन 2026 मध्ये कोट्यवधी रुपयांची उधळण झाली असून अनकॅप्ड खेळाडूंनीही यात मोठी बाजी मारली आहे. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा सारख्या खेळाडूंना मिळालेल्या मोठ्या रकमेमुळे सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

एखादा खेळाडू लिलावात कोट्यवधी रुपयांना विकला जातो, तेव्हा तो रातोरात श्रीमंत होतो हे खरे असले तरी, ही सर्व रक्कम त्याला नेमकी कधी आणि कशी मिळते, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेक क्रिकेट फॅन्सना असते. फ्रेंचायजी खेळाडूंना नेमका कशा प्रकारे पैसा देतात आणि त्यातील अटी काय असतात, याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

करार आणि नोंदणीची प्रक्रिया

एखादा खेळाडू लिलावात खरेदी केला जातो, तेव्हा सर्वात आधी त्याच्याशी लेखी करार केला जातो. या कराराला बीसीसीआयची मंजुरी आवश्यक असते. करारामध्ये त्या खेळाडूची एकूण किंमत, त्याला मिळणारी रिटेनर रक्कम, पेमेंटचे वेळापत्रक आणि टॅक्सशी संबंधित सर्व बाबींचा स्पष्ट उल्लेख असतो. तसेच जर खेळाडू जखमी झाला किंवा काही कारणास्तव करार रद्द करावा लागला, तर त्याचे नियम काय असतील, हे देखील आधीच ठरलेले असते.

( नक्की वाचा : IPL 2026 Auction : आयपीएल ऑक्शनमधील सर्व रक्कम खेळाडूंना मिळते का? किती होते कपात? वाचा सर्व हिशोब )
 

बँकेमार्फत सुरक्षित व्यवहार

आयपीएलमध्ये खेळाडूंना मिळणारी सर्व रक्कम ही अधिकृत बँकिंग मार्गानेच दिली जाते. यामध्ये रोख स्वरूपात पैसे देण्यास सक्त मनाई आहे. भारतीय खेळाडूंसाठी एनईएफटी, आरटीजीएस किंवा आयएमपीएस या मार्गांचा वापर होतो, तर परदेशी खेळाडूंना स्विफ्ट पेमेंटद्वारे पैसे ट्रान्सफर केले जातात. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असते, जेणेकरून कर प्रणालीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.

Advertisement

हप्त्यांमध्ये दिले जाणारे पैसे

खरेदी केलेली सर्व रक्कम खेळाडूला एकाच वेळी दिली जात नाही. साधारणपणे ही रक्कम तीन ते चार टप्प्यांमध्ये विभागलेली असते. प्रत्येक फ्रेंचायजीचे पेमेंट वेळापत्रक थोडे वेगळे असू शकते, परंतु साधारणपणे 15 ते 25 टक्के रक्कम टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी दिली जाते. त्यानंतर 40 ते 50 टक्के रक्कम आयपीएलचा हंगाम सुरू असताना दिली जाते. उरलेली 25 ते 30 टक्के रक्कम ही स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूच्या खात्यात जमा होते.

( नक्की वाचा : IPL 2026 Auction : यूपीच्या पोराने आयपीएल लिलावात केला राडा; चेन्नईला मिळाला नवा 'सर जडेजा' )
 

असे मिळतात पैसे

जर एखाद्या भारतीय खेळाडूला लिलावात 8 कोटी रुपये मिळाले, तर त्याच्या हातात थेट 8 कोटी रुपये पडत नाहीत. नियमानुसार या रकमेवर 30 टक्के टीडीएस कापला जातो. 8 कोटी रुपयांच्या रकमेवर साधारणपणे 2 कोटी 40 लाख रुपये टीडीएस म्हणून वजा होतात. त्यानंतर 5 कोटी 60 लाख रुपये खेळाडूच्या खात्यात तीन ते चार हप्त्यांमध्ये जमा केले जातात.

Advertisement

दुखापत आणि विम्याचे कवच

मैदानावर खेळताना खेळाडू जखमी झाला तर त्याच्या पैशांचे काय होते, हा प्रश्न महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत फ्रेंचायजी त्या खेळाडूला करारातील अटींनुसार काही प्रमाणात पैसे देते. अनेकदा यासाठी विमा कंपन्यांची मदत घेतली जाते. खेळाडूला किती रक्कम मिळेल हे तो नेमका कधी जखमी झाला आहे आणि त्याच्या करारात नेमक्या काय अटी आहेत, यावर अवलंबून असते. या सुरक्षिततेमुळे खेळाडूंना आर्थिक नुकसान सोसावे लागत नाही.

Topics mentioned in this article