IPL 2026 Trade News : आयपीएल 2026 सीझनसाठी खेळाडूंच्या ट्रेड (Trade)च्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. चेन्नई सुपर किंग्सचा रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन (Sanju Samson) या खेळाडूंच्या फ्रँचायझींची अदलाबदल होणार असल्याचं सध्या बोललं जात आहे. त्याचबरोबर पाचवेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनंही एका बड्या खेळाडूला गुपचूप करारबद्ध केलं असल्याचा गौप्यस्फोट झाला आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आर. अश्विननं (R. Ashiwn) हा गौप्यस्फोट केला आहे.
काय आहे सिक्रेट डील?
माजी भारतीय ऑफ-स्पिनर आर. अश्विनने असा दावा केला आहे की, मुंबई इंडियन्सने (MI) लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) ट्रेड डीलमधून संघात घेतले आहे. अर्थात, सध्या याबद्दल कोणत्याही फ्रँचायझीने किंवा इतर कोणत्याही वृत्ताने अधिकृत दुजोरा (Confirmation) दिलेली नाही. मात्र, अश्विनने त्याच्या वक्तव्यात संबंधित व्यवहार झाला असल्याचे म्हंटले आहे.
( नक्की वाचा : IPL 2026 : '... तर जडेजाच नाही, धोनीही CSK मधून बाहेर पडणार', क्रिकेट विश्वातील धक्कादायक बातमी )
आर. अश्विन म्हणाला, "मला वाटत नाही की MI टीम त्यांच्या कोणत्याही मुख्य प्लेयरला रिलीज करेल. दीपक चहर वारंवार इंजर्ड होत असतो, त्यामुळे MI त्याच्या जागी दुसऱ्या प्लेअरचा शोध घेतील का? त्यांनी LSG कडून शार्दुल ठाकूरला ट्रेड करून आपल्या टीममध्ये घेतले आहे." अश्विनच्या या वक्तव्यामुळे IPL ट्रेडमध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांचा ट्रेड होऊ शकतो, अशा चर्चा आधीच सुरू असताना, आता शार्दुल ठाकूरच्या MI मध्ये येण्याच्या बातमीने खळबळ माजवली आहे.
शार्दुलचा IPL आणि आंतरराष्ट्रीय प्रवास
शार्दुल ठाकूर हा 2023 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपचा सदस्य होता. त्यानं वेळवेळी भारतीय टीमकडून उपयुक्त कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे शार्दुल हा मुंबईकर आहे. तसंच तो मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्माचा जवळचा मित्र मानला जातो.
आयपीएल 2025 मध्ये शार्दुल लिलावात अनसोल्ड राहिला होता, पण नंतर मोहसिन खान जखमी झाल्यावर LSG ने त्याला रिप्लेसमेंट म्हणून टीममध्ये घेतले होते. या सीझनमध्ये शार्दुलने 10 मॅचेस खेळल्या आणि 13 विकेट्स काढल्या. त्यावेळी त्याचा इकोनॉमी रेट 11.00 होता.
( नक्की वाचा : MCA Election : मुंबई क्रिकेटमध्ये 'शांतीत क्रांती'; अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध, पडद्यामागे काय घडलं? )
कधी होणार अधिकृत घोषणा?
आता या ट्रेडबद्दल नक्की काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. IPL 2026 साठी सर्व टीम्सना त्यांच्या रिटेंशन लिस्ट (Retained Players List) लवकरच जाहीर करायच्या आहेत आणि याची अधिकृत घोषणा नोव्हेंबर 15 रोजी होण्याची शक्यता आहे. या तारखेला शार्दुल ठाकूरच्या MI मध्ये जाण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब होते की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.