IPL 2026 Trade: आयपीएल 2026 च्या ऑक्शनचे (IPL 2026 Auction) काऊंटडाऊन सुरु झालंय. या ऑक्शनपूर्वी पाचवेळा ही स्पर्धा जिंकणारी चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) टीम चर्चेत आहे. गेल्या सिझनमध्ये शेवटच्या क्रमांकावर असलेल्या सीएसकेला मोठ्या बदलाची गरज आहे. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्स एका मॅचविनर खेळाडूच्या शोधात आहे.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्यातील संभाव्य ट्रेड डीलमुळे आयपीएलमध्ये चर्चांना उधाण आलंय. या सगळ्यात, भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने एक धक्कादायक दावा केला आहे. ही डील प्रत्यक्षात आली आणि संजू टीममध्ये स्थिरावला, तर धोनी आयपीएलचा आगामी सीझन अर्ध्यातच सोडून टीमची कॅप्टन्सी संजूला देऊन टाकू शकतो!
सॅमसनसाठी जडेजाला सोडण्यास धोनी तयार?
संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सचा (RR) कॅप्टन, चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) येण्यासाठी सज्ज आहे. या बदल्यात, जडेजा आणि आणखी एका प्लेअरला RR मध्ये पाठवण्याची तयारी CSK ने दाखवली आहे. दुसऱ्या प्लेअरबद्दल अजून एकमत झालेले नाही. सुरुवातीला सॅम करनचं नाव होतं, पण आता राजस्थान रॉयल्स श्रीलंकेचा फास्ट बॉलर मथीशा पथिरानाला टीममध्ये घेण्यास उत्सुक असल्याचं कळतंय.
( नक्की वाचा : MCA Election : मुंबई क्रिकेटमध्ये 'शांतीत क्रांती'; अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध, पडद्यामागे काय घडलं? )
मोहम्मद कैफने त्याच्या YouTube चॅनलवर बोलताना या ट्रेडवर धोनीच्या दृष्टिकोनातून एक नवी बाजू मांडली आहे. कॅफ म्हणाला, "धोनी त्याची क्रिकेटमधील तल्लख बुद्धिमत्ता वापरून हा निर्णय घेतोय. टीमच्या भविष्याचा विचार करून तो जडेजासारख्या मॅच-विनरला सोडायलाही तयार झालाय, कारण संजूमध्ये CSK चा भावी लीडर दिसतोय."
कैफने जडेजाच्या आयपीएल 2022 मधील कॅप्टन्सीच्या अपयशी वेळेची आठवण करून दिली. त्यावेळी CSK ने पहिल्या 8 मॅचेसपैकी फक्त 1 मॅच जिंकली होती, ज्यामुळे धोनीला पुन्हा टीमचं नेतृत्त्व स्वीकारावं लागलं होतं.
मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, "धोनी आणि जडेजा दोघांनी त्यांचा आयपीएल प्रवास 2008 मध्ये सुरू केला. धोनी CSK मध्ये आल्यापासून त्याने कधी ही फ्रँचायझी सोडली नाही. पण जर हा ट्रेड यशस्वी झाला, तर हा धोनीचा शेवटचा सीझन असू शकतो आणि कदाचित तो हा सीझन पूर्ण देखील करणार नाही."
कैफने या गोष्टीवर जोर दिला की CSK दीर्घकाळापासून धोनीच्या जागी योग्य उत्तराधिकारी शोधत आहे. "जडेजाला कॅप्टन्सी मिळाली, पण तो त्यामध्ये सहज नव्हता. आयपीएलमध्ये प्रत्येकजण लीड करू शकत नाही. धोनीचं दीर्घकाळाचं व्हिजन स्पष्ट आहे. तो जडेजाला सोडून भावी कॅप्टनला टीममध्ये आणायला तयार झालाय," असं कैफनं स्पष्ट केलं.CSK ची संपूर्ण योजना धोनीच्या निवृत्तीनंतर टीमचं नेतृत्व कोण करेल यावर आधारित आहे आणि संजू सॅमसन त्यांना या भूमिकेसाठी सर्वात योग्य पर्याय वाटतोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world