6 hours ago
मुंबई:

IPL 2026 Auction LIVE Updates: क्रिकेट फॅन्स गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा करत होते, ते आयपीएल 2026 साठीचं मिनी ऑक्शन (IPL 2026 Mini Auction) आज अबूधाबीमध्ये होत आहे. या ऑक्शनमध्ये अनेक क्रिकेटपटू कोट्याधीश होतील.

पाचवेळा ही स्पर्धा जिंकणारी चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) टीम 43.40 कोटी रुपयांच्या पर्ससह या ऑक्शनमध्ये उतरणार आहे. तर तीन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सकडं (Kolkata Knight Riders) सर्वाधिक 64.30 कोटी रुपये आहेत.

एकूण 369 खेळाडू या ऑक्शसाठी शॉर्टलिस्ट झाले आहेत.

या आयपीएल ऑक्शनबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या पेजवर वाचायला मिळतील. त्यासाठी ठराविक वेळेनंतर हे पेज रिफ्रेश करा. 
 

Dec 16, 2025 18:53 (IST)

IPL Auction 2026 LIVE: आयपीएल ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं कोणता खेळाडू खरेदी केला? वाचा संपूर्ण यादी

IPL Auction 2026 LIVE: आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं आत्तापर्यंत कोणत्या खेळाडूला खरेदी केलं आहे ते पाहूया

CSK: प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, अकेल हुसेन, मॅट शॉर्ट, अमन खान, सर्फराज खान, राहुल चहर, मॅट हेन्री, झॅक फोल्कस

DC: अकिब नबी, डेव्हिड मिलर, बेन डकेट, पथूम निशांका, लुंगी एन्गिडी, साहिल पारीख, पृथ्वी शॉ, कायले जेमिन्सन. पी. राज

GT: अशोक शर्मा, जेसन होल्डर, ल्यूक वुड, टॉम बँटन

KKR: कॅमेरुन ग्रीन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंह, फिन एलन, प्रशांत सोळंकी, कार्तिक त्यागी, राहुल त्रिपाठी, टीम सैफर्ट, मुस्तफिजूर रहमान, रचिन रविंद्र, आकाशदीप

LSG: मुकल चौधरी, एनरिक नॉर्किया, वहिंदू हसरंगा, नमन तिवारी, जोश इंग्लिस

MI - क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, मोहम्मद इजहार, अथर्व अंकोलकर, मयांक रावत

PBKS:  कूपर कोनली, बेन द्वारशुईस, प्रवीण  दुबे, विशाल निषाद

RR: रवी बिश्नोई, सुशांत शर्मा, विग्नेश पत्तूर, यश राज पुंजा, रवि सिंह, अ‍ॅडम मिल्ने, कुलदीप सेन

RCB : व्यंकटेश अय्यर, जेकब डफी, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, कनिष्क चौहान, विकी ओस्तवाल

SRH : शिवांग कुमार , सलिल अरोरा, साकिब हुसेन, करण फुलेत्रा, लियाम लिव्हिंगस्टोन, अमन राव, जॅक एडवर्डस

Dec 16, 2025 18:28 (IST)

IPL Auction 2026 LIVE: आयपीएल ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं कोणता खेळाडू खरेदी केला? वाचा संपूर्ण यादी

IPL Auction 2026 LIVE: आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं आत्तापर्यंत कोणत्या खेळाडूला खरेदी केलं आहे ते पाहूया


CSK: प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, अकेल हुसेन

DC: अकिब नबी, डेव्हिड मिलर, बेन डकेट

GT: अशोक शर्मा

KKR: कॅमेरुन ग्रीन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंह, फिन एलन, प्रशांत सोळंकी, कार्तिक त्यागी

LSG: मुकल चौधरी, एनरिक नॉर्किया, वहिंदू हसरंगा, नमन तिवारी

MI - क्विंटन डी कॉक

PBKS: -

RR: रवी बिश्नोई, सुशांत शर्मा, विग्नेश पत्तूर, यश राज पुंजा

RCB : व्यंकटेश अय्यर, जेकब डफी

SRH : शिवांग कुमार 

Dec 16, 2025 17:17 (IST)

IPL Auction 2026 : CSK नं केला नवा आयपीएल रेकॉर्ड, 2 अनोळखी खेळाडूंवर लावली विक्रमी बोली

IPL 2026 Auction Live Update : चेन्नई सुपर किंग्सनं  या आयपीएल लिलावात नवा रेकॉर्ड केला आहे. त्यांनी प्रशांत वीर आणि कार्तिक शर्ना या दोन uncapped खेळाडूंना प्रत्येकी 14 कोटी 20 लाखांना खरेदी केले आहे.

Uncapped म्हणजे आजवर एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना आयपीएल ऑक्शनमध्ये मिळालेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.

प्रशांत वीर आणि कार्तिक शर्माला मोठी बोली लागणार हा अंदाज NDTV मराठीनं व्यक्त केला होता. तो खरा ठरला आहे. या दोन खेळाडूंबद्दल अधिक वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Dec 16, 2025 16:52 (IST)

IPL Auction 2026 : दिग्गज खेळाडू फेल, पण जम्मू काश्मीरचा खेळाडू झाला मालामाल !

IPL 2026 Auction लाईव्ह अपडेट : आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये दिग्गज खेळाडू अनसोल्ड ठरत आहेत. त्याचवेळी जम्मू काश्मीरचा उंचपुरा फास्ट बॉलर अकीब नबी हा मालामाल झाला आहे. त्याला 8 कोटी 40 लाखांमध्ये दिल्लीनं खरेदी केलं. तो आता आगामी आयपीएलमध्ये दिग्गज फास्ट बॉलर मिचेल स्टार्कसह खेळणार आहे. 

बारामुल्लाचा असणाऱ्या अकीब नबीनं सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्या या स्पर्धेत तीनवेळा एका इनिंगमध्ये पाचपेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. 

अकीबबद्दल अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement
Dec 16, 2025 16:13 (IST)

IPL 2026 Auction Live: जडेजाला मिळाला नवा जोडीदार,राजस्थानची मोठी खरेदी

IPL 2026 Auction Live: भारतीय लेग स्पिनर रवी बिश्नोईला खरेदी करण्यासाठीही चांगलीच चुरस रंगली. बिश्नोईला खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्सनं सुरुवातीला बोली लावली. त्याला चेन्नई सुपर किंग्सनं आव्हान दिलं. या दोघांमध्ये खरेदीसाठी स्पर्धा रंगली होती. पण, त्यामध्ये सनरायझर्स हैदराबादनं एन्ट्री घेतली.

पण, राजस्थान रॉयल्सनं हैदराबादचं आव्हान मोडीत काढत बिश्नोईला 7 कोटी 40 लाखांमध्ये खरेदी केलं. तो आता रविंद्र जडेजासह राजस्थानकडून खेळणार आहे.

Dec 16, 2025 16:01 (IST)

IPL 2026 Auction Live: धोनीनं ज्याचं कौतुक केलं त्याच्यासोबत CSK नं काय केलं... सर्वांनाच धक्का

IPL 2026 Auction Live: चेन्नई सुपर किंग्सचा माजी फास्ट बॉलर मथीशा पथिराणाला  खरेदी केलं आहे. पथिराणाला खरेदी करण्यासाठी लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी चुरस रंगली होती. अखेर  या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सनं बाजी मारली. त्याला केकेआरनं 18 कोटींना खरेदी केलं. 

पथिराणाच्या ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या भूमिकेनं सर्वांना आश्चर्य वाटलं. कारण सीएसकेनं त्याच्यासाठी एकदाही बोली लावली नाही. पथिराणा हा गेल्या सिझनपर्यंत सीएसकेचा प्रमुख बॉलर होता. यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनंही त्याचं कौतुक केलं होतं. पण, त्याच्यावर सीएसकेनं एकदाही बोली न लावल्यानं फॅन्समध्ये आश्चर्य वाटत आहे. 

Advertisement
Dec 16, 2025 15:26 (IST)

IPL Auction 2026 Live: मुंबई इंडियन्सनं खरेदा केला पहिला खेळाडू, दिग्गज खेळाडू स्वस्तात मिळाला !

IPL Auction 2026 Live: मुंबई इंडियन्सनं या ऑक्शनमध्ये पहिला खेळाडू खरेदी केला आहे. मुंबई इंडियन्सनं दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्विंटन डी कॉकला 1 कोटी रुपयांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केले. 

Dec 16, 2025 15:23 (IST)

IPL Auction 2026 Live: व्यंकटेश अय्यरला मिळाली नवी टीम, KKR नं खूप प्रयत्न केला पण, या टीमनं मारली बाजी

IPL Auction 2026 Live: भारतीय ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरला नवी टीम मिळाली आहे. या ऑक्शनमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं त्याच्यावर पहिली बोली लावली. त्यानंतर आरसीबी आणि केकेआरमध्ये त्याला खरेदी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. अखेर यामध्ये आरसीबीनं बाजी मारली. त्याला 7 कोटी रुपयांमध्ये आरसीबीनं खरेदी केलं. त्यामुळे आता व्यंकटेश अय्यर पुढील सिझनमध्ये आरसीबीकडून खेळेल. 

Advertisement
Dec 16, 2025 15:13 (IST)

IPL Auction 2026 Live: श्रीलंकेचा खेळाडू लखनौकडं, हसरंगाला मिळाली नवी टीम

IPL Auction 2026 Live: श्रीलंकेचा प्रमुख स्पिनर वनिंदू हसरंगाला लखनौ सुपर जायटंसनं 2 कोटींना खरेदी केलं. 

Dec 16, 2025 14:57 (IST)

IPL Auction 2026 Live: कॅमेरुन ग्रीनवर लागली मोठी बोली, वाचा कुणी आणि कितीमध्ये केलं खरेदी?

IPL Auction 2026 Live:  ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर कॅमेरुन ग्रीनवर अपेक्षेप्रमाणे मोठी बोली लावली. मुंबई इंडियन्सनं या बोलीला सुरुवात केली. त्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये त्याला खरेदी करण्यासाठी जोरदार चुरस रंगली. 

राजस्थान रॉयल्सनं काही वेळानं या बोलीतून माघार घेतली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सनं बोली लावत ही चुरस वाढवली. केकेआर आणि सीएसकेमध्ये ग्रीनला घेण्यासाठी मोठी चढाओढ रंगली होती. अखेर कोलकाता नाईट रायडर्सनं ग्रीनला 25 कोटी 20 लाखांना खरेदी केलं.

Dec 16, 2025 14:44 (IST)

IPL Auction 2026 Live: आयपीएल ऑक्शनला सुरुवात, पहिल्यात राऊंडमध्ये मोठा धक्का, पृथ्वी शॉ....

IPL Auction 2026 Live:  आयपीएल 2026 च्या ऑक्शची सुरुवात धक्कादायक झाली. मुंबईचा आक्रमक खेळाडू पृथ्वी शॉ अनसोल्ड ठरला. या राऊंडमध्ये त्याच्यावर कुणीही बोली लावली नाही. 

पृथ्वी शॉ प्रमाणेच सर्फराज खान हा मुंबईकरही अनसोल्ड ठरला. 

Dec 16, 2025 14:42 (IST)

IPL Auction 2026 Live: आयपीएल ऑक्शनला सुरुवात, पहिला खेळाडू कुणी खरेदी केला? वाचा सर्व अपडेट

IPL Auction 2026 Live: आयपीएल 2026 साठीच्या ऑक्शनला अबूधाबीमध्ये सुरुवात झाली आहे. हे मिनी ऑक्शन असून एक दिवस चालणार आहे.

या ऑक्शनमधील सर्वात पहिल्यांदा जेक फ्रेजर मॅगर्कवर बोली लागली. पण, तो अनसोल्ड ठरला. त्यानंतर डेव्हिड मिलरवर बोली लागली. त्याला दिल्ली कॅपिटल्सनं खरेदी केलं. 

Dec 16, 2025 13:41 (IST)

IPL 2026 Auction Live: सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात तरुण खेळाडू कोण?

IPL 2026 Auction Live: 39 वर्षांचा जलज सक्सेना (Jalaj Saxena) या आयपीएल लिलावातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तर अफगाणिस्तानचा वहिदुल्ला जद्रान (Wahidullah Zadran)  हा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याचे वय 18 पेक्षा कमी आहे. 

Dec 16, 2025 13:37 (IST)

IPL 2026 Auction Live : कधी, कुठे, आणि कोणत्या खेळाडूंवर बोली? काय आहेत नियम? वाचा लिलावाशी संबंधित सर्व उत्तरं

Dec 16, 2025 13:22 (IST)

IPL 2026 Auction Live: प्रत्येक टीममधील किती जागा शिल्लक?

10 टीममधील 77 जागांसाठी यंदा ऑक्शन होणार आहे. त्यासाठी 369 खेळाडू शॉर्टलिस्ट झाले आहेत.

कोणत्या टीममध्ये किती जागा रिक्त आहेत ते पाहूया

CSK: 9 (4 विदेशी )

Delhi Capitals 8 (5 विदेशी)

Gujarat Titans: 5 (4 विदेशी)

Kolkata Knight Riders: 13 (6 विदेशी)

Lucknow Super Giants: 6 (4 विदेशी)

Mumbai Indians: 5 (1 विदेशी)

Punjab Kings: 4 (2 विदेशी)

Rajasthan Royals: 9 (1 विदेशी)

Royal Challengers Bengaluru: 8 (2 विदेशी)

Sunrisers Hyderabad: 10 (2 विदेशी)